Lalbaugcha Raja's Gold and Silver Auction :मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला गणेशोत्सवात दान मिळालेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचा लिलाव करण्यात आला. या लिलावात तब्बल २ कोटी ३५ लाख १८ हजार रुपयांच्या दागिन्यांची बोली भाविकांनी लावली. या रकमेचा उपयोग हा मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी करण्यात येणार आहे.
मुंबईतील लालबागचा राजाची नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख आहे. या गणेशोत्सवाच्या काळात मुंबईसह संपूर्ण राज्यातून आणि देशभरातून भाविक लालबागच्या गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. तसेच मोठ्या प्रमाणात भाविक गणपती पुढे दान देत असतात. या वर्षी देखील भाविकांनी गणेशोत्सवात विविध वस्तूंचे, सोन्या चांदीच्या दगिन्यांचे दान केले. या वर्षी ५.६५ कोटी रुपये रोख, ४.१५ किलो सोनं आणि ६४.३२ किलो चांदी लालबागचा राजा गणपतीला अर्पण करण्यात आले.
लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वार्षिक लिलावात २.३५ कोटी रुपये मिळाले ज्यात १ किलो सोन्याची विट ७५.९ लाख रुपयांना विकली गेली. यासह आणखी १ किलो वजनाचा सोन्याचा हार ७४ लाख रुपयांना विकला गेला. गणेशोत्सवादरम्यान ज्या पंडालमध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते, त्याच पंडालमध्ये शनिवारी हा लिलाव झाला.
खजिनदार मंगेश दळवी यांनी शुक्रवारी सांगितले की, ७ ते २० सप्टेंबरपर्यंत एकूण ५.६५ कोटी रुपयांची रोकड मंडळाला मिळाली आहे. या लिलावात मिळालेल्या रकमेसह मंडळाची यावर्षी ८ कोटींची कमाई झाली.
शुक्रवारी २२ कॅरेट सोन्याचा दर ७२३१० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा दर ७४,००० रुपये प्रति १० ग्रॅम होता. चांदीचा भाव ८९,००० रुपये प्रति किलो होता. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे म्हणाले की, भाविकांनी मूर्ती, मूषक, मुकुट, हार, गदा, घरे, साखळ्या, बोटांच्या अंगठ्या, मोदक, समई (उंच तेलाचे दिवे) आणि अगदी चांदीच्या खडूंच्या पादत्राणांची एक छोटी जोडी दान म्हणून दिल्या आहेत. भक्तांनी अर्पण केळलेय या दगिन्यांचा लिलाव करण्यात आला. अनंत अंबानी यांनी दान केलेला १६ कोटी रुपयांचा २० किलोचा सोन्याचा मुकुट लिलावासाठी ठेवण्यात आला नव्हता.
२०२३ मध्ये, मंडळाला दान हुंडीमध्ये आठ दिवसांत ३.२ किलो सोने आणि ५१.६ किलो चांदीचे दान करण्यात आले होते. यामध्ये १ किलो वजनाचा सोन्याचा हार आणि १०० ग्रॅम सोन्याचा बार यांचा समावेश होता.
संबंधित बातम्या