Lalbaugcha Raja 2024 Darshan: आजपासून (७ सप्टेंबर २०२४) गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे. हा सण संपूर्ण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या वर्षी आपल्या लाडक्या बाप्पाचे ७ सप्टेंबरला आगमन होणार आहे. तर, १७ सप्टेंबर २०२४ अनंत चतुर्थी असेल. गणेशोत्सवात ठिकठिकाणी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. दरम्यान, लालबागचा राजा मुंबईतील सर्वात लोकप्रिय सार्वजनिक गणेश मंडळ म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबईतील परळ परिसरात असलेल्या लालबागच्या राजाला विशेष महत्त्व आहे. भक्तांच्या नवसाला पावणारा बाप्पा म्हणून लालबागचा राजाची सर्वदूर ख्याती आहे. यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे येतात. परंतु, लालबागचा राजाचे दर्शन घेणे, इतके सोपे नाही. अनेक तास रांगेत उभे राहिल्यानंतर भक्तांना बापाची झलक दिसते. मात्र, कामाचा व्याप, घरातील अडचणींमुळे लालबागच्या राजाचे दर्शन घेणे अनेकांना शक्य होत नाही, अशा लोकांना आता घरबसल्या लालबागच्या राजाचे दर्शन घेता येणार आहे.
लालबागचा राजाचे दर्शन सकाळी ५ ते रात्री ११ या वेळेत करता येते. बाप्पाची तीन वेळा पूजा केली जाणार आहे. सकाळची पूजा सकाळी ६ ते सायंकाळी ७ या वेळेत होणार आहे. दुपारची पूजा दुपारी १ ते २ या वेळेत तर संध्याकाळची पूजा सायंकाळी ७ ते ८ या वेळेत होणार आहे.
सकाळची आरती संध्याकाळी ७ ते ७.१५ दरम्यान असेल. दुपारची आरती रात्री १ ते १.१५ या वेळेत होईल. सायंकाळची आरती सकाळी ७ ते सायंकाळी ७.१५ या वेळेत होईल.
लालबागच्या राजाचे लाईव्ह दर्शन घेण्यासाठी भाविक मंडळाची अधिकृत वेबसाईट lalbaugcharaja.com येथे भेट देऊ शकतात. याशिवाय, भाविक फेसबूक, इंस्टाग्राम आणि युट्यूबच्या माध्यमातूनही आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेऊ शकतात.
फेसबूक- m.facebook.com/LalbaugchaRaja
यूट्यूब- youtube.com/user/LalbaugRaja
इन्स्टाग्राम- instagram.com/lalbaugcharaja
लालबागच्या राजाची सर्वात प्रथम स्थापना १९३४ साली करण्यात आली. दरम्यान, १९३२ मध्ये पेरू चाळ बंद पडल्याने स्थानिकांना मोठे नुकसान झाले. त्यावेळी स्थानिक मच्छिमारांना कठीण परिस्थितीतून जावे लागले. त्यांना आपला माल रस्त्यावर विकावा लागत होता. यानंतर तेथील लोकांनी काही पैसे जमवले आणि गणपतीची छोटी मूर्तीची स्थापना केली. दोन वर्षानंतर लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्या आणि १२ सप्टेंबर १९३४ पासून गणेशमूर्ती स्थापना करण्याची परंपरा सुरू झाली. पहिली मूर्ती साधी २ फूट उंचीची मातीची मूर्ती होती. मात्र, कालांतराने मूर्तीचा आकार आणि लोकप्रियताही वाढत गेली. दरम्यान, १९५० साली लालबागचा राजा मुंबईतील प्रसिद्ध गणेश पंडाल बनला होता.