मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  लालबाग हत्याकांडात नवा ट्विस्ट, आईचा शिडीवरून पडून मृत्यू, मग मृतदेहाचे तुकडे का केले?

लालबाग हत्याकांडात नवा ट्विस्ट, आईचा शिडीवरून पडून मृत्यू, मग मृतदेहाचे तुकडे का केले?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 19, 2023 02:38 PM IST

Lalbaug Murder Case: लालबाग हत्याकांडसंदर्भात आणखी एक माहिती समोर आली आहे.

Representative Use
Representative Use (HT_PRINT)

Lalbaug Murder: मुंबईच्या लालबाग परिसरात २३ वर्षाच्या मुलीने जन्मदात्या आईची हत्या करून मृतदेहाचे ५ तुकडे केल्याची घटनेने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला मुलीला बेड्या ठोकल्या असून हत्येमागील सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आरोपी मुलीने पोलिसांच्या चौकशीत मोठा खुलासा केला. मी आईची हत्या केली नसून तिचा शिडीवरून पडल्याने मृत्यू झाल्याचे आरोपीने सांगितले. मग मृतदेहाचे ५ तुकडे का केले? असा प्रश्न विचारल्यानंतर आरोपीने दिलेले उत्तर ऐकून पोलीसही चक्रावून गेले.

रिंपल जैनने पोलीस चौकशीत असे म्हटले आहे की, तिची आई वीणा जैन या २७ डिसेंबर २०२२ रोजी शिडीवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाली. मात्र, या घटनेच्या दोन दिवसानंतर म्हणजेच २९ डिसेंबरला वीणाचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूमुळे ती घाबरली. आईच्या हत्येचा आरोप आपल्यावरच येईल, असे तिला वाटले. यामुळे तिने आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी इंटरनेटची मदत घेतली. मृतदेह २ दिवस घरात ठेवल्यानंतर दुर्गंधी वाढू लागल्यावर पुन्हा इंटरनेटवर वास जाण्यासाठी काय करावे हे तिने शोधले. यानंतर तिने ऑनलाइन चहाची पाने, फिनाईल आणि एअर फ्रेशनर खरेदी करून त्यांचा वापर केला.

तसेच मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी तिने शेजारच्या दुकानातून मार्बल कटर विकत घेतले. एवढेच नव्हेतर मृतदेहाचे तुकडे करण्यासाटी तिने संगमरवरी कटर खरेदी केले. परंतु, मृतदेह पूर्णपणे कापला जात नसल्याने आरोपीने चाकूचाही वापर केल्याचे चौकशीत म्हटले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी इमारतीच्या तळमजल्यावरील रेस्टॉरंटमधील एका कर्मचाऱ्याची चौकशी केली. आरोपीची आई खाली पडल्यानंतर तिला पहिल्या मजल्यावर घेऊन जाण्यास या कर्मचाऱ्याने मदत केली होती. त्यावेळी वीणा जैन या श्वास घेत नसल्याचे कर्मचाऱ्याने आरोपीला सांगितले. मात्र, त्यावेळी आरोपीने मी मॅनेज करते म्हणाली, असेही कर्मचाऱ्याने म्हटले आहे.

IPL_Entry_Point

विभाग