राज्यात लाडकी बहीण योजनेची चर्चा मात्र बारामतीत ‘लाडकी सुनबाई’ योजनेची हवा! पोस्टर व्हायरल-ladki sun yojana after ladki bahin yojna in baramati poster goes viral ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज्यात लाडकी बहीण योजनेची चर्चा मात्र बारामतीत ‘लाडकी सुनबाई’ योजनेची हवा! पोस्टर व्हायरल

राज्यात लाडकी बहीण योजनेची चर्चा मात्र बारामतीत ‘लाडकी सुनबाई’ योजनेची हवा! पोस्टर व्हायरल

Aug 02, 2024 11:37 PM IST

Ladkisunyojana : बारामतीमधील एका हॉटेल चालकाने अनोखी शक्कल लढवली आहे. बारामतीमधील हॉटेल व्यावसायिक आनंद जाधव यांनी लाडकी सुनबाई योजना आणली आहे.

बारामतीत ‘लाडकी सुनबाई’ योजनेची हवा!
बारामतीत ‘लाडकी सुनबाई’ योजनेची हवा!

Ladki sunbai yojana : राज्य सरकारने यावर्षीच्या अर्थसंकल्पात अनेक योजनांची घोषणा करून समाजातील सर्व घटकांना खुश करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यभर महिलांची कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावापळ होताना पाहायला मिळत आहे. या योजनेनंतर विरोधकांना बहिणीसाठी आणली भावांसाठी काय?असा प्रश्न विरोधकांनी केला. त्यानंतर महायुती सरकारने राज्यातील भावांसाठीही योजना आणली. दरम्यानबारामतीमध्ये या दोन्ही योजनांसोबत आणखी एका योजनेचा बोलबाला दिसून येत आहे. बारामतीमध्ये लाडकी सुनबाई योजना आणली आहे. सोशल मीडियावर याच्या पोस्टरने खळबळ उडवली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेल्या दोन महिन्यापासून चर्चेत आहे. यावरून बारामतीमधील एका हॉटेल चालकाने अनोखी शक्कल लढवली आहे. बारामतीमधील हॉटेल व्यावसायिक आनंद जाधव यांनी लाडकी सुनबाई योजना आणली आहे. मात्र या योजनेच्या लाभासाठी त्यांनी अटी ठेवल्या आहेत.

विशेष म्हणजे कुटूंबीय या हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर केवळ सूनबाईला जेवण मोफत मिळणार आहे. लाडकी सुनबाई योजनेत सासुबाईच्या जेवणावर सुनबाईचे जेवण मोफत मिळणार आहे. विशेष म्हणजे जी थाळी सासूबाईंना घेतली आहे, तीच थाळी सूनबाईंना मोफत मिळणार आहे. यासाठी घरातील कमीत कमी पाच लोकांनी एकत्र जेवायला येणे आवश्यक आहे. त्यात सासूबाई असणे तर अनिवार्य आहे. हॉटेलच्या प्रसिद्धीसाठी तसेच गिऱ्हाईक वाढवण्यासाठी ही अनोखी शक्कल लढवली आहे.

लाडकी सून’ योजना सुरू करा,थेट मंत्री पत्नीची मागणी –

सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना आणली, तशीच आता ‘लाडकी सून’ योजना आणावी. अशी योजना आली तर जगातील सर्वच महिला या योजनेचं स्वागत करतील. सरकारने ‘लाडकी सून’ योजना सुरू करावी. अशी मागणी मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या पत्नी किरण वळसे पाटील यांनी केली. ही योजना आली तर सुनांचं नशीब उजळेल. असं म्हणत या योजनेला राज्यातीलचं नव्हे तर जगातील सगळ्याच महिलांची संमती राहील, असा विश्वास किरण वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील मंचरमध्ये सरकारने लागू केलेल्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

किरण वळसे पाटील म्हणाल्या की, प्रत्येक मुलगी हे कधी न कधी सून होतेच अन् त्याचं सूनेचं दुःख कोणाला कळत नाही. ‘लाडकी सून’ योजना आली तर आपलं नशीब उजळेल,असंही किरण वळसेंनी आवर्जून नमूद केलं.

विभाग