विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने सुरू केलेली लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात प्रचंड गाजली. या योजनेच्या बळावर महायुतीने विधानसभेत घवघवीत यश मिळवत सत्तेच्या चाव्या परत मिळवल्या. सत्ताधाऱ्यांनी याचे श्रेय राज्यातील महिलांना दिले. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून महिलांना सहा हफ्ते म्हणजेच ९ हजार रुपये मिळाले आहेत. डिसेंबरचा १५०० रुपयांचा हप्ता नुकताच बँक खात्यात जमा झाला आहे. नव्या वर्षापासून महिलांना २१०० रुपये मिळणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच महिलांना हुरहुर लावणारी बातमी समोर आली आहे.
लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी केली जाणार असल्याची चर्चा सुरू असताना लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कार, नोकरी, उत्पन्न अडीच लाखाहून अधिक असेल तर अशा महिलांचे अर्ज बाद होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेमुळे मोठा फायदा झाला आहे. मात्र आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची फेरतपासणी केली जात आहे. कारण लाडकी बहीण योजनेत फसवणूक करून पैसे घेतल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या की, सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही. तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्जाची छाननी करणार नाही. उत्पन्नात वाढ झाली असेल, अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेलं असेल तर त्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत. लग्र झाल्यावर स्थलांतरित, आधार कार्डचा चुकीचा नंबर समाविष्ट होणे, सरकारी नोकरी लागणे, त्यामुळे मी या योजनेस पात्र होत नाही
उत्पन्नामध्ये वाढ होऊन उत्पन्न २.५ लाख होणे, चारचाकी वाहन, आंतरराज्य विवाह, सरकारी नोकरी, आधार कार्ड आणि बँक पासबुकवरील नावामध्ये फरक असेल तर अशा महिला पात्र ठरणार नाहीत. मात्र अडीच लाखांहून कमी उत्पन्न असलेल्या महिलांना लाभ पुढेही मिळत राहील. मात्र ज्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती कर भरत असेल, ज्या महिला सरकारी नोकरीला आहेत, अथवा ज्यांना पेन्शन मिळत आहेत. अशा महिला देखील योजनेसाठी पात्र नाहीत. असं आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
संबंधित बातम्या