Ladki Bahin Yojana Scheme : अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊनलाडकी बहीण योजनेच्या पात्र अर्जांचीपडताळणी करणार आहेत. लाडक्या बहिणींच्या घरी चारचाकी असेल तर आता'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा त्यांना लाभ सोडावा लागणार आहे.याचदरम्यान अंगणवाडी सेविकांनी सरकारकडे ४ मागण्याकरत त्या मान्य न केल्यास लाडकी बहीण योजनेच्या सर्वेक्षणाचं काम करणार नाही,असा इशारा दिला आहे.त्याचबरोबर३ मार्च रोजी मुंबईत विधानसभेवर मोर्चा काढणार असल्याचाइशाराहीअमरावती अंगणवाडी सेविकांनी दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने लाभार्थी महिलांच्या अर्जाची पुन्हा छाननी सुरू केली आहे. यासाठी सरकार अपात्र महिलांनी आपले अर्ज मागे घेण्याचे आवाहन करत आहे. आता सरकारने या अर्जाच्या छाननी प्रक्रियेला वेग दिला आहे. अमरावतीच्या महिला बालविकास विभागाच्या मुख्य कार्यालयावर आज जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला होता. यावेळी महिला बालकल्याण कार्यालयासमोरील रस्ता महिलांनी अडवला. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास लाडकी बहीण योजनेच्या कामावर अंगणवाडी सेविका बहिष्कार घालतील, असा इशारा सेविकांनी दिला.
राज्यातील सुमारे अडीच कोटींमहिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. यामध्ये निकषांची पूर्तता न करणाऱ्या महिलांची संख्या अधिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महिला व बालकल्याण विभागाने निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका जाऊन घरात चारचाकी आहे, का याची पडताळणी करणार आहेत. चारचाकी असलेल्या बहिणी अपात्र ठरणार आहेत.
संबंधित बातम्या