Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'साठी गुड न्यूज! नवरात्रीतच सरकारने दिली मोठी अपडेट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'साठी गुड न्यूज! नवरात्रीतच सरकारने दिली मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'साठी गुड न्यूज! नवरात्रीतच सरकारने दिली मोठी अपडेट

Published Oct 12, 2024 05:11 PM IST

Ladkibahinyojana Update : राज्यभरातील महिलांना दिलासा देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी आता लाभार्थी महिलांना १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

'लाडक्या बहिणीं'साठी गुड न्यूज!
'लाडक्या बहिणीं'साठी गुड न्यूज!

Mukhyamantri Ladki Bahin Yojana :  माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातील महिलांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळत असून पात्र महिलांच्या बँक खात्यात साडे सात हजार रुपये जमा झाले आहेत. त्यातच आता सरकारने राज्यभरातील महिलांना दिलासा देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी आता लाभार्थी महिलांना १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप सदर योजनेसाठी अर्ज दाखल केले नाहीत त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी आणखी एक संधी मिळाली आहे. याआधी या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२४ होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अजूनपर्यंत अर्ज करू न शकलेल्या महिलांसाठी सरकारने आणखी चार दिवसांची मुदतवाढ दिली आहे. १५ ऑक्टोबर रोजी रात्री १२ पर्यंत महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत. मात्र हे अर्ज अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातूनच दाखल करावेत, अशी अट सरकारने ठेवली आहे.

सरकारच्या निर्णयामुळे महिलांना या योजनेसाठी नव्याने अर्ज करण्याची संधी मिळाली आहे. पुढील ४ दिवसांत अर्ज करुन या योजनेचा लाभ घेता येईल. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप अर्ज भरले नाहीयेत, त्यांनी लगेच अर्ज करा. लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर पहिल्यांदा अर्ज करण्यासाठी आधी १ जुलै २०२४ ते १५ जुलै २०२४ पर्यंत मुदत दिली होती. परंतु त्यानंतर ती वाढवून ३१ ऑगस्ट केली. त्यानंतर पुन्हा एकदा मुदत वाढवून ३० सप्टेंबर केली. आता तिसऱ्यांदा मुदत वाढवते १५ ऑक्टोंबर करण्यात आली आहे.

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही योजना सुरू केल्याची टीका विरोधकांकडून या योजनेवरून केली जात आहे. तसेच ही योजना किती दिवस सुरू राहील, असे प्रश्न विरोधी पक्षांकडून उपस्थित केलं जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना पुढेही सुरू राहणार असून टप्प्याटप्याने रक्कम वाढवली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड येथील वचनपूर्ती मेळाव्यात दिली होती. ही रक्कम दीड हजार रुपयावरून ३ हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर