Ladki Bahin Yojana April installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेलं असतानाच आता खुशखबर समोर आली आहे. अक्षय्य तृतीयेला एप्रिल महिन्याचा हफ्ता मिळणार होता, मात्र अजूनही १५०० रुपये खात्यात जमा न झाल्याने लाडक्या बहिणींना धाकधूक लागली होती. आता राज्यातील काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरूवात झाली आहे.
राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा केला असला तरी मे महिन्याच्या हप्त्याची अपडेट अद्याप आलेली नाही. मे महिन्याचा हफ्ताही लवकरच खात्यात जमा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात येत्या २ ते ३ दिवसांमध्ये जमा होईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी दिली होती. त्यानुसार काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. तर, ज्या लाडक्या बहिणींना पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे एकूण १२००० रुपये मिळतात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून दरमहा ५०० रुपये दिले जाणार आहेत.
महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ही रक्कम एप्रिल महिन्याची आहे. मे महिन्याच्या १५०० रुपयांबाबत अद्याप कोणती माहिती समोर आलेली नाही. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे १५०० आणि मार्च महिन्याचे १५०० रुपये देण्यात आले होते. एप्रिल महिन्याचा हफ्ता जमा होण्यास सुरूवात झाली आहे. साधारणपणे या योजनेचे पैसे महिना अखेरीस महिलांच्या बँक खात्यात जमा होतात. मात्र मार्च महिन्यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्यामुळे तांत्रिक कारणास्तव एप्रिल महिन्याचा हफ्ता जमा होण्यास विलंब झाल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून माहिती दिली होती की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे.
संबंधित बातम्या