Maharashtra Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. १ जुलैपासून या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत. मात्र, या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी गेलेल्या महिलांची फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी आलेल्या महिलांकडे पैसे मागितल्यास किंवा कोणत्याही प्रकारची गडबड झाल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला. याच पार्श्वभूमीवर अकोल्यात योजनेच्या नोंदणीसाठी महिलांकडून तलाठीने लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संबंधित तलाठीचे निलंबन करण्यात आले असून लवकरच त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल.
राजेश शेळके असे निलंबन झालेल्या तलाठीचे नाव आहे. लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी आलेल्या महिलांकडून मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शेळकेविरोधात कारवाई करण्यात आली. शेळके यांच्याविरोधात अकोल्यातील सिव्हील लाईन पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम १९८ आणि ३१८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्यांना अटक केली जाईल. मोठी उमरी येथील तलाठी कार्यालयात योजनेसाठी नोंदणी सुरू होती. त्यावेळी शेळके यांनी महिलांकडून लाच घेतली, याचा व्हिडिओ व्हायरल होताच त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.
- २१ ते ६० वयोगटातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार.
- वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असलेल्या महिला.
- कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असलेल्या महिला.
- इन्कम टॅक्स भरणारी महिला या योजनेस पात्र नसेल.
- सरकारी योजनेतून मानधन घेणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू नाही.
- सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
१) आधार कार्ड
२) जात प्रमाणपत्र
३) मूळ निवासी प्रमाणपत्र
४) रेशन कार्ड
५) उत्पन्नाचा दाखला
६) बँकेचे पासबूक
८) मोबाईल क्रमांक
९) पासपोर्ट साईज फोटो
१०) माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म
- ग्रामीण भागातील महिलांना ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे नोंदणी करावी लागेल.
- शहरी भागतील महिलांना वॉर्ड ऑफिसरकडे नोंदणी करावी लागेल.
संबंधित बातम्या