Ladaki Bahin Yojana Sixth Installment :राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी असून लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हफ्त्याबाबत महत्वाची बातमी समोर आलीआहे. डिसेंबर महिन्याच्या हप्ता कधी जमा होणार याची गेल्या अनेक दिवसांपासूनचर्चा सुरू आहे. आता महिलांना सहाव्या हफ्त्याचे पैसे कधी येणार याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून (मंगळवार) सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
येत्या आठवडाभरामध्ये राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या हफ्त्याचे पैसे मिळणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यामुळे लाडक्या बहिणींचा वर्षाचा शेवट गोड होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसांगितले की, राज्यातील लाडक्या बहिणींना येत्या आठवडाभरात सहाव्या हफ्त्याचे पैसे दिले जातील.लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्षाअखेर पर्यंत पैसे जमा होणार आहेत. मात्र हा हफ्ता २१०० रुपये मिळणार नसून १५०० रुपये असणार आहे. आतापर्यंत महिलांना साडे सात हजार रुपये मिळाले आहेत.सहाव्या हफ्त्याचे पैसे मिळाल्यानंतर या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना एकूण ९००० रुपये मिळतील.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कमेत ६०० रुपयांची वाढ करुन २१०० रुपये करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे डिसेंबरचा हफ्ता २१०० रुपये येणार की १५०० रुपये येणार याची चर्चा सुरू होती. मात्र आता सहावा हप्ता हा जुन्या धोरणाप्रमाणे १५०० रुपये येणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात सांगितले होते की, डिसेंबरचा हप्ता १५०० रुपयांप्रमाणेच जमा होणारआहे. योजनेचा सहावा हप्ता आजपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून यापूर्वी पाच हफ्ते मिळालेल्या२ कोटी ३५ लाख महिलांना आठवडाभरात १५०० रुपयांप्रमाणे सहावा हफ्ता जमा होणार आहेत. तर निवडणुकीआधी नव्याने प्राप्त झालेल्या २५ लाख महिलांच्या अर्जाची छाननी सुरू आहे. तीपूर्ण झाल्यानंतर या महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
संबंधित बातम्या