मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'कुंवरी बेगम'ने मुलांसोबत 'डर्टी टॉक'साठी घरात तयार केली चॅटरूम; मुलांच्या लैंगिक शोषणाच्या देत होती टिप्स

'कुंवरी बेगम'ने मुलांसोबत 'डर्टी टॉक'साठी घरात तयार केली चॅटरूम; मुलांच्या लैंगिक शोषणाच्या देत होती टिप्स

Jun 15, 2024 11:33 AM IST

kunwari begum shikha maitreya arrested : 'कुंवारी बेगम' नावाच्या यूट्यूब चॅनेलवर मुलांच्या लैंगिग शोषणाच्या टिप्स दिल्याप्रकरणी शिखा मैत्रेय या तरुणीला अटक करण्यात आली आहे. शिखाने लाइव्ह स्ट्रीमिंगसाठी तिच्या घरात चॅट रूम तयार केली होती.

'कुंवरी बेगम'ने मुलांसोबत 'डर्टी टॉक'साठी घरात टायर केली चॅटरूम; मुलांच्या लैंगिग शोषणाच्या देत होती होती टिप्स
'कुंवरी बेगम'ने मुलांसोबत 'डर्टी टॉक'साठी घरात टायर केली चॅटरूम; मुलांच्या लैंगिग शोषणाच्या देत होती होती टिप्स

kunwari begum shikha maitreya arrested : 'कुंवारी बेगम' नावाच्या यूट्यूब चॅनलवर 'मुलांना लैंगिक अत्याचारासाठी प्रवृत्त केल्या'प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिखा मैत्रेय या तरुणीने लाइव्ह स्ट्रीमिंगसाठी तिच्या घरातच चॅट रूम तयार केल्याचे तपासात उघड झाले आहे.

 सोशल मीडियावर झालेल्या गदारोळानंतर गाझियाबाद पोलिसांनी 'कुंवारी बेगम' फेम यूट्यूबरला अटक केली. या प्रकरणी अनेक बाबींच्या उलगडा होणे बाकी आहे. दिल्लीतील एका कंपनीत ई-कॉमर्स एक्झिक्युटिव्ह असलेल्या आरोपी शिखाचा मोबाईल फोन, लॅपटॉप आणि संगणक पोलिसांनी जप्त केला आहे. त्यातून शिखाने डिलीट केलेला डाटा रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

नुकताच कुंवारी बेगम नावाच्या युट्युबरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये ती लहान मुलांच्या लैंगिक छळाच्या पद्धती सांगत होती. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी कारवाईची मागणी केली होती. यानंतर पोलिसांनी तिला अटक केली होती. एसीपी इंदिरापुरम रितेश त्रिपाठी यांनी सांगितले की तपासात असे दिसून आले की मुलीने घरी एक चॅट रूम तयार केली होती आणि तेथून ती लाइव्ह स्ट्रीमिंग करत होती. यात ती तिच्या चॅनेलवर लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देत असे. हा व्हायरल व्हिडिओ ८ जून रोजी घरून तयार करण्यात आला होता यात तिने लहान मुलांचे शोषण करण्यासाठी टिप्स दिल्या होत्या.

गुन्हा दाखल करणाऱ्या एनजीओच्या संस्थापक दीपिकाने सांगितले की, यापूर्वी गगन नावाच्या तरुणाने व्हिडिओला विरोध केला होता. त्यांनी तक्रार केल्यावर शिखाने सर्व व्हिडिओ डिलीट केले. पोलिसांनी तरुणी आणि तिच्या घरातून जप्त केलेला मोबाईल, लॅपटॉप आणि संगणक तपासासाठी पाठवला आहे. डिलीट झालेला डेटा रिकव्हर करण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान शिखा ही अनेकांसोबत अश्लील चॅट देखील करत होती. या पूर्वी एका यूट्यूबबरने तिची पोल खोल केली होती. यानंतर तिने तिच्या चॅनलवरुन सर्व अश्लील व्हिडिओ काढून टाकले होते. त्यानंतर पुन्हा तिने हा घाणेरडा चॅटिंगचा प्रकार सुरू केला होता. 

 

WhatsApp channel
विभाग