‘ठाणे की रिक्षा… चेहरे पे दाढी… ऑंखो पे चष्मा…’ कॉमेडियन कुणाल कामरा व्यंगात्मक गाण्यातून नेमकं काय म्हणाला?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘ठाणे की रिक्षा… चेहरे पे दाढी… ऑंखो पे चष्मा…’ कॉमेडियन कुणाल कामरा व्यंगात्मक गाण्यातून नेमकं काय म्हणाला?

‘ठाणे की रिक्षा… चेहरे पे दाढी… ऑंखो पे चष्मा…’ कॉमेडियन कुणाल कामरा व्यंगात्मक गाण्यातून नेमकं काय म्हणाला?

HT Marathi Desk HT Marathi
Updated Mar 24, 2025 02:16 PM IST

कॉमेडियन कुणाल कामरा याने मुंबईत झालेल्या एका शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे थेट नाव न घेता 'ठाण्याचा रिक्षावाला' आणि 'दुसऱ्याचे वडील चोरणारा गद्दार' असा उल्लेख एका गाण्याच्या माध्यमातून केल्याने शिंदेसेनेकडून संताप व्यक्त केला जात आहे.

कॉमेडियन कुणाल कामरा व्यंगात्मक गाण्यातून नेमकं काय म्हणाला?
कॉमेडियन कुणाल कामरा व्यंगात्मक गाण्यातून नेमकं काय म्हणाला?

प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा याने यूट्यूबवर पोस्ट केलेल्या एका व्यंगात्मक गाण्याच्या व्हिडिओमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. कुणाल कामरा याने कुणाचेही नाव न घेता

‘ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, ऑंखो पे चष्मा, हाए…

एक झलक दिखलाए, कभी गोवाहाटी मे छुप जाए’

मेरी नजर से तुम देखो तो गद्दर नजर ओ आए

असं गाणं असलेला व्हिडिओ ट्विट केला आहे. यावर चिडलेल्या शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत खार येथील कुणाल कामरा याच्या स्टुडिओची तोडफोड केली असून पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. दरम्यान, कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ‘तुम्ही कुणाल कामरा यांचं पूर्ण गाणं नीट ऐका. त्यांनी जनभावना बोलून दाखवली आहे. शिंदे हे फडणवीस यांच्या मांडीवर बसत असल्याने त्यांना सांभाळण्याऐवजी ते आणखी काय करतील? सत्य बोलल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत असेल तर मग ‘सत्यमेव जयतेऐवजी गद्दारमेव जयते असं वाक्य लिहा’, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पुरा गाना सुन लो

दरम्यान, कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले नसल्याने ही टिका त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना का झोंबली. शिंदे हे गद्दार आहेत, असं आम्ही जाहीरपणे बोलतो. कामरा यांनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असं विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

घराणेशाहीला संपवण्यासाठी वडिलांची चोरी

कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे नाव न घेता ते मंत्रालयात बसण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवर जास्त आढळतात, असं व्यंग केलं आहे. दरम्यान, शिंदे हे आपल्या वडिलांच्या नावाचा वापर राजकीय फायद्यासाठी करतात, असा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीही केला होता.

शिवसेना-शिंदे गटाचे खासदार आणि शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नरेश म्हस्के यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कुणाल कामरा आमच्यावर अशा प्रकारे हल्ला करणार असेल तर शिवसैनिक त्याला धडा शिकवतील, असं म्हस्के यांनी म्हटले आहे. 'ही मानहानी आहे. आम्ही हे सहन करू शकत नाही,' असं म्हस्के म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात एकही कार्यकर्ता शिल्लक नसल्याने शिवसेनेची खिल्ली उडविण्यासाठी विनोदी कलाकारांची नेमणूक केली जात असल्याचा आरोप म्हस्के यांनी केला आहे.

मुंबईतील अंधेरी (पूर्व)चे शिवसेनेचे आमदार मुरजी काका पटेल यांनी कुणाल कामरा यांच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे. शिंदे यांच्यावर टीका करून कामरा अत्यंत खालच्या पातळीवर गेल्याचा आरोप पटेल यांनी केला आहे. 'आम्ही कामरा विरोधात एफआयआर दाखल केला आहे. दोन दिवसांत त्यांनी माफी मागितली नाही, तर आम्ही त्यांचा चेहरा काळा करू, असा इशारा पटेल यांनी दिला आहे.

कुणाल कामरा नेमकं काय म्हणाला? व्हिडिओ पहा

Whats_app_banner

संबंधित बातम्या