Kolhapur Railway Accident: कोल्हापुरात रेल्वे रुळ ओलांडताना कोयना एक्स्प्रेसनं उडवलं; तिघांचा जागीच मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kolhapur Railway Accident: कोल्हापुरात रेल्वे रुळ ओलांडताना कोयना एक्स्प्रेसनं उडवलं; तिघांचा जागीच मृत्यू

Kolhapur Railway Accident: कोल्हापुरात रेल्वे रुळ ओलांडताना कोयना एक्स्प्रेसनं उडवलं; तिघांचा जागीच मृत्यू

Jun 15, 2024 10:05 PM IST

Kolhapur Train Accident: कोल्हापुरात कोयना एक्स्प्रेसच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

कोल्हापुरात रेल्वे अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापुरात रेल्वे अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. (HT_PRINT)

Kolhapur Accident: रेल्वे रुळ ओलांडण्याच्या प्रयत्नात कोयना एक्स्प्रेसच्या धडकेत दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. कोल्हापुरातील विक्रमनगर परिसरात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी सांगितले की, मृतांमध्ये दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. मृत महिला ३० ते ४० वयोगटातील आहेत. तर, अल्पवयीन मुलीचे वय १० ते १२ वर्षे असण्याची शक्यता आहे. मुंबईकडून येणाऱ्या कोयना एक्स्प्रेसने या तिघांना उडवले, या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला.

सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. हा अपघात आहे की आत्महत्या, याचा पोलीस शोध घेत आहेत. मृतक विक्रमनगरहून मार्केट यार्डच्या दिशेने जात होते. अरुंद लेन आणि रेल्वे मार्ग आहे ज्याचा वापर स्थानिक लोक एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी करतात. मृत महिलांना आपण रेल्वे रुळ ओलांडत आहोत, याची कल्पना नव्हती, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मुंबई: रेल्वेच्या मोटरमनने वाचवले प्रवाशाचे प्राण

मध्य रेल्वेच्या मुंब्रा-कळवा स्थानकांदरम्यान रेल्वे रूळाजवळ एक जखमी प्रवासी पडल्याचे दिसताच रेल्वेचा मोटरमन जगपाल सिंह तत्काळ लोकल थांबवली. यानंतर इतर प्रवाशांच्या मदतीने जखमी व्यक्तीला लोकलमध्ये बसवले आणि पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्याकरीता कळवा स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केले. मोटरमनच्या सतर्कतेमुळे संबंधित व्यक्तीचे प्राण वाचले. याआधी मुलुंड- ठाणेदरम्यान आणि दिवा रेल्वेस्थानकाजवळ असाच प्रकार घडला. दिवा रेल्वे स्थानकाजवळ धावती लोकल येत असल्याचे बघून एक महिलेने अचानक रेल्वे रूळावर उडी घेतली. हे पाहिल्यानंतर रेल्वेचे मोटरमन एन. व्ही. पाटील यांनी तत्काळ आपत्कालीन ब्रेक दाबून लोकल थांबवली. तर, मुलुंड- ठाणेदरम्यान ओएचई संरचना रेल्वे रूळाच्या दिशेने वाकलेली होती. हे मोटरमन हेमंत किशोर यांच्या लक्षात येताच त्यांनी लोकल थांबवली. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर