मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uday Samant threat : कोकणातील रिफायनरीचा वाद पेटला; मंत्री उदय सामंत यांना जाळून मारण्याची धमकी

Uday Samant threat : कोकणातील रिफायनरीचा वाद पेटला; मंत्री उदय सामंत यांना जाळून मारण्याची धमकी

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 12, 2022 12:04 PM IST

Threat to Uday Samant over Konkan Refinery Project: कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या एका कार्यकर्त्यानं मंत्री उदय सामंत यांना जाहीर धमकी दिली आहे.

Uday Samant
Uday Samant

Uday Samant gets threat over Konkan Refinery Project: कोकणातील रिफायनरी विरोधाचा वाद संपण्याचं नावच घेत नाही. राज्यात अनेकदा सत्ताबदल झाल्यानंतरही या वादावर तोडगा निघालेला नाही. राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत. याच वादातून आणि लोकप्रतिनिधींवरील रागातून एका कार्यकर्त्यानं मंत्री उदय सामंत यांना जाळून टाकण्याची धमकी दिली आहे. धमकीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नरेंद्र जोशी असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच कोकणातील राजापूर इथं रिफायनरी विरोधकांची बैठक घेतली. या भेटीवेळी स्थानिकांनी आपापल्या भूमिका मांडल्या. यावेळी बोलताना नरेंद्र जोशी भलतेच आक्रमक झाले. आम्ही मुंबत असलो तरी आमच्यावर गुन्हे दाखल केले जातात. कुठल्या आधारे टाकले जातात? कोणीतरी मंत्री सांगतो म्हणून आम्हाला त्रास दिला जातो. हे आम्ही खपवून घेणार नाही असं सांगत त्यांनी उदय सामंत यांचं थेट नाव घेत त्यांना जाळून मारण्याची धमकी दिली. आमचा गाव आणि आमची पंचक्रोशी आम्ही सोडणार नाही, असंही नरेंद्र जोशी यावेळी म्हणाले.

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस अधीक्षक मोहनकुमार गर्ग यांनी उदय सामंत यांच्याशी याविषयी चर्चा केली आणि पुढील चौकशीची ग्वाही दिली.

WhatsApp channel

संबंधित बातम्या