मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Konkan Refinery : कोकणातील रिफायनरीचा मार्ग मोकळा; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांच्या बारसू, सोलगावला मान्यता

Konkan Refinery : कोकणातील रिफायनरीचा मार्ग मोकळा; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांच्या बारसू, सोलगावला मान्यता

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 24, 2022 07:53 AM IST

Konkan refinery News : कोकण रिफायनरी कोकणात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी ही रिफायनरी बारसू आणि सोलगावला करण्यास मान्यता दिली आहे.

Konkan refinery
Konkan refinery

मुंबई : कोकणवासीयांसाठी एक महत्वाची बातमी आहे. नव्या रिफायनरीच्या राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगाव या गावांतील जागेला केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन त्यांनी केलेल्या सकारात्मक चर्चेमुळे या गावांना मान्यता देण्यात आली आहे.

नाणार येथील रिफायनरीला स्थानिक नागरीकांनी मोठ्या प्रमाणणात विरोध केल्याने हा प्रकल्प रद्द करण्यात आला होता. त्यामुळे नव्या जागेची चाचपणी केली जात होती. त्यात राजापूर येथील बारसू आणि सोलगाव येथील जागांना मान्यता देण्यात आली आहे. या गावातील नागरिकांनीही त्यांच्या जमिनी प्रकल्पाला देण्यास मान्यता दिली आहे. या साठी आणखी काही बैठका होणार आहे.

सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी पेट्रोलियम मंत्री हरिदिप सिंह पुरी यांची भेट घेतली. त्यानंतर या रिफायनरीच्या जागे संदर्भात चर्चा झाली. त्यामुळे आता या रिफायनरीच्या कामासंदर्भात वेगाने हालचाली होतान दिसत आहे. रिफायनरीवरुन मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले होते. यावरून राजकारणही रंगले होते. मात्र, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या बाबत सकारात्मकता दाखवल्याने नव्या जागेबाबत चर्चा सुरू आहे. तब्बल ६० मिलियन मिलियन मेट्रिक टन क्षमतेचा हा प्रकल्प आहे. मात्र, बारसू आणि सोलगाव या ठिकाणी उभारली जाणारी रिफायनरी ही २० मिलियन मॅट्रिक टन इतक्या क्षमतेची आहे. रिफायनरीची क्षमता कमी करून कोकणाच्या आर्थिक विकासामध्ये बाधा नको. नाणारमध्ये मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध होत असल्यास त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेची अर्थात ६० मिलियन मॅट्रिक टन क्षमतेची रिफायनरी उभी करावी असे काहींचे म्हणने आहे. नवी दिल्ली इथे काही दिवसांपूर्वी बोलताना महाराष्ट्र किंवा रत्नागिरीच नव्हे तर देशातल्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी भागाचा विचार केल्यास या ठिकाणच्या कोणत्याही भागात रिफायनरी उभारली जाईल असे केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले होते. शिवसेनेचे स्थानिक आमदार राजन साळवी हे रिफायनरी समर्थनार्थ आहेत. त्यामुळे आता नव्या रिफायनरीचा जागा ही जुनीच राहणार की नव्या जागेवर होणार या बाबतही चर्चा सुरू आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग