Konkan Railway Recruitment 2024: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये १९० जागांसाठी १६ सप्टेंबरपासून अर्ज मागिवले जात आहेत. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन असून महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
कोकण रेल्वेच्या जाहीरातीनुसार, या भरती अंतर्गत वरिष्ठ विभाग अभियंता, सहाय्यक लोको पायलट, वरिष्ठ विभाग अभियंता, ट्रॅक मेंटेनर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, पॉईंट मॅन आणि सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन आणि वाणिज्य विभागात विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर २०२४ आहे. तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी आहे.
वरिष्ठ विभाग अभियंता: ५ जागा
टेक्नीशियन: १५ जागा
सहाय्यक लोको पायलट: १५ जागा
वरिष्ठ विभाग अभियंता: ५ जागा
ट्रॅक मेंटेनर: ३५ जागा
टेक्नीशियन: २०
स्टेशन मास्टर: १० जागा
गुड्स ट्रेन मॅनेजर: ५जागा
पॉईंट मॅन: ६० जागा
ईएसटीएम: १५ जागा
वाणिज्य पर्यवेक्षक: ५ जागा
ज्या उमेदवारांची जमीन केआरसीएल प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली आहे, ते या पदांसाठी अर्ज करू शकतात. जमीन गमावणाऱ्यांची पत्नी किंवा पती, मुलगा, मुलगी, नातू आणि नात देखील पात्र आहेत. या उमेदवारांना निवड प्रक्रियेत पहिली पसंती मिळणार आहे. तसेच महाराष्ट्र, गोवा किंवा कर्नाटकमध्ये रहिवासी असलेल्या आणि कोकण रेल्वे मार्गावरील एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये नोंदणीकृत वैध रोजगार विनिमय कार्ड असलेल्या उमेदवारांना भरती मोहिमेत दुसरी पसंती मिळेल. केआरसीएल संस्थेत किमान तीन वर्षे नियमित सेवा पूर्ण केलेले कर्मचारीही या नोकरीसाठी पात्र ठरतील.
वरील पात्रता अटींची पूर्तता करणारे आणि १ ऑगस्ट २०२४ रोजी १८ ते ३६ वर्षे वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. कोविड-१९ महामारीमुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना दिलासा देण्यासाठी कमाल वयोमर्यादा ३३ वरून ३६ करण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत आणखी सूट देण्यात येणार आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटल