Konkan Railway News : कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी! जुलै महिन्यात कोकण रेल्वे पनवेलपर्यंतच धावणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Konkan Railway News : कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी! जुलै महिन्यात कोकण रेल्वे पनवेलपर्यंतच धावणार

Konkan Railway News : कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी! जुलै महिन्यात कोकण रेल्वे पनवेलपर्यंतच धावणार

Jun 28, 2024 11:34 AM IST

Konkan Railway news : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या मार्गात महिन्याभरासाठी बदल करण्यात आला आहे. या गाड्या एलटीटी ऐवजी पनवेलपर्यंतच धावणार असून या गाड्या पनवेलवरूनच सुटणार आहे. प्रवाशांनी याची दखल घेऊन नियोजन करावे असे आवाहन रेल्वेने केले आहे.

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! कोकण रेल्वे महिनाभर पनवेलपर्यंतच धावणार!
प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! कोकण रेल्वे महिनाभर पनवेलपर्यंतच धावणार!

Konkan Railway news : कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे पायाभूत कामासाठी मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. हा ब्लॉक महिनाभर राहणार आहे. १ ते ३० जुलै या कालावधीत येथून कोकण मार्गे धावणाऱ्या नेत्रावती व मत्स्यगंधा एक्स्प्रेस एलटीटीऐवजी पनवेलपर्यंतच धावणार आहे. तर या गाड्या पनवेलवरूनच सुटणार आहे. ३० जून पासून हे बदल करण्यात येणार आहे. महिनाभर होणाऱ्या गैरसोईबद्दल रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली असून प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनलवर देखभाल दुरुस्ती आणि काही महत्वाची कामे हाती घेण्यात आली आहे. या कामासाठी महिनाभर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या ब्लॉक दरम्यान एलटीटीच्या यार्डमधील रेल्वेगाड्यांची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या मर्यादित मार्गिकेची (पिट लाइन) कामे केली जाणार आहे. तर इतर कामे या ब्लॉक काळात केली जाणार आहे. त्यामुळे नेत्रावती व मत्स्यगंधा या एक्स्प्रेसच्या थांब्यात अंशतः बदल करण्यात आला आहे.

या ब्लॉक काळात गाडी क्रमांक १६३४६ तिरुअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान रोज धावणारी नेत्रावती एक्स्प्रेस ३० जून ते ३० जुलै दरम्यान, लोकमान्य टिळक टर्मिनस ऐवजी पनवेल स्थानकात थांबेल. तर गाडी क्रमांक १६३४५ लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम दरम्यान धावणारी नेत्रावती एक्सप्रेस १ ते ३० जुलै लोकमान्य टर्मिनल ऐवजी पनवेल स्थानकातून सुटणार आहे. तर मंगळूर सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी मत्स्यगंधा (१२६२०) एक्सप्रेस ही ३० जून ते ३० जुलै या कालावधीत पनवेलपर्यंतच धावणार आहे. गाडी क्रमांक १२६१९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूर सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेस १ ते ३० जुलै या कालावधीत पनवेल येथून सुटणार आहे. नागरिकांनी हे बदल लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकणातील रेल्वेगाड्यांचे दोन डबे वाढवले

कोकण रेल्वेंने कोकणात जणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रवाशांची ही वाढलेली संख्या पाहता कोकणात जाणाऱ्या व येणाऱ्या रेल्वेगाडीला दोन डबे वाढवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. हिसार-कोईम्बतूर साप्ताहिक एक्स्प्रेसला द्वितीय व तृतीय वातानुकूलित डबा वाढवण्यात येणार आहे. तर २२४७५ हिसार-कोईम्बतूर साप्ताहिक एक्स्प्रेस ३ ते ३१ जुलैपर्यंत व गाडी क्रमांक २२४७६ क्रमांकाची कोईम्बतूर – हिसार साप्ताहिक एक्स्प्रेसला ६ जुलैपासून ते ३ ऑगस्टपर्यंत एक द्वितीय श्रेणीचा वातानुकूलित डबा व एक स्लिपर कोचचा डबा जोडला जाणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर