Kolhapur Politics : आम्ही फोडणार नाही, पण निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करणार; सतेज पाटलांचा इशारा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kolhapur Politics : आम्ही फोडणार नाही, पण निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करणार; सतेज पाटलांचा इशारा

Kolhapur Politics : आम्ही फोडणार नाही, पण निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करणार; सतेज पाटलांचा इशारा

Published Oct 31, 2024 11:48 PM IST

Satej Patil On Jayshri Jadhav : जयश्री जाधव यांनी किमान जाताना किंवा काही अडचण असल्यास माझ्याशी बोलायला हवं होतं. आता जे कृत्य त्यांनी केलं आहे ते जाधव कुटुंबाला शोभणारं नाही. त्यांनी घेतलेला निर्णय क्लेषदायी असल्याचे आमदार पाटील म्हणाले.

सतेज पाटील व जयश्री जाधव
सतेज पाटील व जयश्री जाधव

कोल्हापूर उत्तर मधील विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी आज काँग्रेसला सोडचिट्टी देत मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभा लढण्यासाठी त्या इच्छुक होत्या मात्र पक्षाने त्यांची उमेदवारी डावलल्याने तसेच उमेदवार ठरवताना विश्वासात न घेता निर्णय घेतल्याचा आरोप करत पक्ष सोडला आहे. यावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सतेज पाटील म्हणाले की, पोट निवडणुकीत जयश्रीताई यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं होतं,२०१९ च्या निवडणुकीत चंद्रकांत जाधव यांना सुद्धा निवडून आणण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. जयश्री जाधव यांनी किमान जाताना किंवा काही अडचण असल्यास माझ्याशी बोलायला हवं होतं. आता जे कृत्य त्यांनी केलं आहे ते जाधव कुटुंबाला शोभणारं नाही. त्यांनी घेतलेला निर्णय क्लेषदायी असल्याचे आमदार पाटील म्हणाले.

सतेज पाटील म्हणाले की, जी फोडाफोडी सत्ता स्थापन करताना झाली होती तीच फोडाफोडी कोल्हापूरमध्ये झाली आहे. स्वत:च्या ताकदीवर जिंकण्याची खात्री नसल्यानेच जयश्री जाधव यांना पक्षात घेतलं आहे. या पक्षप्रवेशासाठी मुंबईला घेऊन गेले, असा टोला पाटील यांनी क्षीरसागर यांना लगावला. जयश्री ताईना खासगी विमानाने मुंबईला नेण्यात आले. त्यांच्यावर काही दबाव होता की, काय हे जयश्री जाधव सांगू शकतील. मात्र, कोल्हापूर जिल्ह्याती जनता हे सहन करणार नाही.

जयश्री जाधव यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, त्या पुन्हा लढण्यास इच्छुक होत्या. मात्र मात्र,मतदारसंघातीलवस्तुस्थिती समजावून सांगितल्यानंतर त्यांनी मान्य केलं होतं. आम्ही फोडाफोडी करणार नाही मात्र निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे पाटील म्हणाले. जयश्री जाधव यांच्या पक्ष प्रवेशाने आमचा विजय आणखी सुकर झाला असल्याचे सतेज पाटील यांनी म्हटले.

 

पक्षात प्रवेश करताना शिवसेनेने जाधव यांची उपनेतेपदी निवड केली आहे. तिकीट नाकारल्यामुळे जाधव नाराज होत्या. त्यांच्या नाराजीचा फायदा उठवत शिंदे सेनेचे कोल्हापूर उत्तरचे उमेदवार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीमोठा राजकीय डाव टाकत जाधव यांना आपल्या बाजुने वळवले व पक्षात प्रवेश घडवून आणला. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरूवारी हा प्रवेश झाला. यावेळी क्षीरसागर यांच्यासह खासदार धैर्यशील माने,  माजी खासदार संजय मंडलिक, सत्यजित जाधव उपस्थित होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर