कोल्हापूर दिल्ली विमानसेवेची घोषणा झाल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून असलेली कोल्हापूर ते गोवा थेट विमानसेवा सुद्धा लवकरच सुरु होणार आहे. येत्या १९ सप्टेंबरपासून कोल्हापूर ते गोवा विमानसेवा सुरु होणार आहे. आठवड्यातील दोन दिवस कोल्हापूर-गोवा विमानसेवा असणार असून अवघ्या काही मिनिटात कोल्हापुरातून गोव्यात पोहोचता येणार आहे.
कोल्हापुरातून दिल्ली व गोव्याला थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत होती. आता गोवा-कोल्हापूर आणि कोल्हापूर-हैदराबाद, हैदराबाद कोल्हापूर आणि कोल्हापूर-गोवा अशी ही दैनंदिन सेवा सुरू होईल. यादृष्टीने नियोजन केले जात आहे. त्यामुळे आणखी एक विमान कंपनी कोल्हापूरशी जोडली जाणार आहे. कोल्हापूर ते तिरुपती व कोल्हापूर मुंबई विमानसेवाही सुरू आहे.
कोल्हापूर विमानतळावरुन सध्या मुंबई, हैद्राबाद येथे नियमित विमानसेवा सुरु आहे. आता गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरु झाल्याने प्रवाशांना केवळ २० ते ३० मिनिटात गोव्याला जाता येणार आहे. या मार्गावर विमानसेवा सुरु करण्याची मागणी केली जात होती. या मागणीला आता लवकरच मूर्त स्वरुप येणार आहे.
कोल्हापूर विमानतळावरून दिल्ली आणि अहमदाबादसाठी विमानसेवा सुरु करण्याबाबत हालचाली सुरु आहेत.येत्या २७ ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर विमानतळाने आणखी एक मैलाचा दगड पार केला आहे.तसेच, बंद झालेली कोल्हापूर - अहमदाबाद विमानसेवा देखील लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर ते दिल्ली या मार्गाव रइंडिगो कंपनीचे सुमारे १८० आसन क्षमतेचे विमान कोल्हापूर-दिल्ली-कोल्हापूर या मार्गावर उड्डाण करणार आहे. विमान कंपनीची ट्रायल घेण्याबाबत सध्या काम प्रगतीपथावर आहे. कोल्हापूर-दिल्ली-कोल्हापूर या मार्गावर हवाई सेवेचा प्रस्ताव उड्डाण मंत्रालयाकडे अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर कोल्हापूर -नागपूर मार्गावरही विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबईसाठी स्लॉन मिळत नसल्याने कोल्हापूर मुंबई मार्गावर विमान फेऱ्या कमी आहेत. मात्र पुढच्या वर्षी नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर कोल्हापूरवासीयांना फायदा मिळणार आहे. नवी मुंबईचे विमानतळ सुरू झाल्यानंतर कोल्हापूर-मुंबई मार्गावर सकाळी आणि रात्रीच्या वेळी फ्लाईटची संख्या वाढणार आहे.