मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  kolhapur : तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच मिळेल; श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचे सूचक व्यक्तव्य

kolhapur : तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच मिळेल; श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचे सूचक व्यक्तव्य

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 28, 2024 07:17 AM IST

kolhapur loksabha election 2024: संपूर्ण देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून कोण उभे राहील याची देखील चर्चा सुरू आहे. यात महाविकास आघाडी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे.

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती

kolhapur loksabha election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची जोरदार तयारी सुरू आहे. तर महावीकास आघाडी देखील आपले उमेदवार उभे करण्यासाठी राज्यातील मतदार संघात चाचपणी करत आहे. दरम्यान, कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून कुणाला उमेदवारी मिळेल या बाबत चर्चा सुरू असतांना श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी एका कार्यक्रमात सूचक वक्तव्य केले. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत देत लवकरच तुम्हाला अपेक्षित ब्रेकिंग न्यूज मिळेल आणि ही न्यूज सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असेल. मात्र, या साठी तुमचं मार्गदर्शन लागेल असे ते म्हणाले.

Maharashtra weather update : विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात आजही बरसणार; राज्यात पुढील काही दिवस असे असेल हवामान

कोल्हापुरात मंगळवारी ब्रेकिंग न्यूज पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. सध्या तरी मला कोणतेही ऑफर नाही, मात्र पुढील काही दिवसांत ती मिळण्याची शक्यता आहे. असे व्यक्तव्य केले होते. तसेच काल झालेल्या ब्रेकिंग न्यूज या पुस्तक प्रकाशन सोहळ्यातही त्यांनी त्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत दिले.

Gaganyaan: गगनयान लवकरच अवकाशात झेपवणार! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला मोहिमेचा आढावा, पाहा फोटो

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले, तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच येणार आहे. मात्र हे ब्रेकिंग न्यूज कोल्हापुरातून नाहीतर दुसऱ्या गावातून येणार आहे. पण ती फक्त ब्रेकिंग न्यूज नसेल तर जबाबदारी सुद्धा असेल. ऐशोआराम करण्यासाठी ही ब्रेकिंग न्यूज नसेल तर ती केवळ तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असेल. यामुळे आता येणाऱ्या काळात मला तुमचं मार्गदर्शन लागणार आहे, असे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले. ते म्हणाले, कोल्हापूरच्या चांगल्यासाठी व विकासासाठी जे काही करायचे आहे यासाठी मी नेहमी तुमच्या सोबत राहणार असून संवाद देखील साधेन. आपण सर्वांनी मिळून काम केलं तर अनेक गोष्टी लवकर होतील, असे ते यावेळी म्हणाले आहेत.

लोकसभेचा मुद्दा दिल्ली पर्यंत

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीवरून रान पेटले आहे. महायुती कुणाला उमेदवारी देणार या बाबत चर्चा सुरू आहे. तर महावीकस आघाडीने देखील आपला उमेदवार जवळपास ठरवला आहे. दरम्यान, यावरून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले, कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवारीचा मुद्दा दिल्लीपर्यंत गेल्याचे मला कळले आहे. दिल्लीमध्ये काय होईल हे मला माहित नाही. मी या दृष्टीने कधीच दिल्लीला गेलो नाही आणि मुंबईलाही गेलो नाही. मी कोल्हापूर मध्ये शांत बसून आहे. मात्र सर्वांची अपेक्षा असेल तर तुमच्यासाठी मी नेहमी उपलब्ध राहील.

IPL_Entry_Point

विभाग