पक्षाशी गद्दारी करणारे चालतात का? उद्धव ठाकरेंना सवाल, पदाधिकाऱ्याला अश्रू अनावर-kolhapur politics muralidhar jadhav on uddhav thackeray after being removed district president ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पक्षाशी गद्दारी करणारे चालतात का? उद्धव ठाकरेंना सवाल, पदाधिकाऱ्याला अश्रू अनावर

पक्षाशी गद्दारी करणारे चालतात का? उद्धव ठाकरेंना सवाल, पदाधिकाऱ्याला अश्रू अनावर

Jan 05, 2024 09:05 PM IST

Uddhav Thackeray :मी शिंदे गटात गेलो नाही म्हणून माझा एमआयडीसीमधील एक कोटीचा प्लॉट काढून घेण्यात आला. तरीही पक्षाने माझ्यावर अन्याय केला आहे, अशी नाराजी मुरलीधर जाधव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.

 Muralidhar Jadhav
Muralidhar Jadhav

राजू शेट्टी यांना हातकणंगले मतदारसंघात पाठिंबा न देता शिवसैनिकाला उमेदवारी द्या, जीवाचं रान करतो असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका केल्यानंतर कोल्हापुरातील ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची तातडीने उचलबांगडी केली होती. उद्धव ठाकरे यांनी हे आदेश दिले आहेत. त्यानंतर पत्रकार परिषद घेत मुरलीधर जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुरलीधर जाधव म्हणाले की, मी शिंदे गटात गेलो नाही म्हणून माझा एमआयडीसीमधील एक कोटीचा प्लॉट काढून घेण्यात आला. तरीही पक्षाने माझ्यावर अन्याय केला आहे. एमआयडीसीमध्ये कोट्यवधींचा भूखंड घोटाळा झाला आहे. त्यामध्ये माजी आमदार सुजित मिनचेकर यांची टोळी काम करते. सुजित मिणचेकर यांनी सांगितले की,मुरलीधर जाधव यांचा प्लॉट काढून घ्या म्हणजे शिंदे गटात येतील, असे मुरलीधर जाधव म्हणाले.

पक्षाशी गद्दारी करणारे तुम्हाला चालतात का? असा सवाल करत जाधव यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले की, गेल्या १९ वर्षापासून जिल्ह्यात पक्षाचे काम निष्ठेने केले. तरी मला पदावरून पायउतार केलं आहे. उद्धव ठाकरे यांना घेरलेले बडवे यासाठी जबाबदार असून यामध्ये उपनेत्या सुषमा अंधारे,संपर्कप्रमुख अरुण दूधवाडकर, माजी आमदार सुचित मिणचेकर यांचा समावेश आहे, असेही मुलरीधार जाधव म्हणाले.

 

मुरलीधर जाधव यांनी दोन दिवसापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर कडाडून टीका करत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजू शेट्टी यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुरलीधर जाधव यांना जिल्हाप्रमुख पदावरून पदमुक्त करत दोन नव्या जिल्हाप्रमुखांची नियुक्ती केली आहे.

Whats_app_banner