kolhapur PavanGad madrasa : कोल्हापुरात पन्हाळा गडा जवळील पावनगडावर असलेल्या अतिक्रमणावर प्रशासानने बुलडोझर चालवला आहे. येथील अनधिकृत मदरसे पाडण्यात आले आहे. काल रात्री दोन वाजता चोख पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई तब्बल ६ तास चालली. येथील मदरसे हटवण्यात यावे या साठी हिंदूत्ववाद संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पावनगडावर गेल्या काही दिवसांपासूंन अनधिकृत बांधकामे वाढली होती. या ठिकाणी काही अनिधिकृत मदरसे देखील उभारण्यात आले होते. येथील अनधिकृत मदरसे काढण्यात यावे या साठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. यामुळे पालिका प्रशासाने मध्यरात्री २ वाजता ही कारवाई सुरू केली. ही कारवाई सकाळी ८ वाजेपर्यंत सुरू होती. काल रात्रीपासून या गडावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. कारवाई दरम्यान, अनुचित प्रकार होऊ नये म्हणून काळजी घेण्यात आली होती. अनेक अधिकारी रात्री गडावर मुक्काम ठोकून होते. आता देखील गडावर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर गडावर येणारे सर्व मार्ग देखील बंड करण्यात होते.
पावनगडावर पाडण्यात आलेला अनाधिकृत मदरसा हा १९८९ साली बांधण्यात आला होता. त्यानंतर हे अनधिकृत मदरसे पाडण्यात यावे अशी मागणी होत होती. मात्र, कारवाई केली जात नव्हती. या माद्रशात उत्तरप्रदेश आणि बिहारमधील मुले शिक्षण घेत असल्याची माहिती देखील पुढे आली होती. त्यामुळे हे मदरसे अनधिकृत असल्याने हिंदुत्ववादी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात होत्या. या बाबत पालिका प्रशासानके कारवाई देखील करण्यात आली होती. त्यानंतर आज ही कारवाई अखेर करण्यात आली.
संबंधित बातम्या