Kolhapur News : शाहू महाराज छत्रपतींविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; कोल्हापूर तापलं
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kolhapur News : शाहू महाराज छत्रपतींविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; कोल्हापूर तापलं

Kolhapur News : शाहू महाराज छत्रपतींविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; कोल्हापूर तापलं

Published Apr 01, 2024 04:13 PM IST

Shahu Maharaj Chhatrapati : महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्या जात असल्याने कोल्हापूरचं वातावरण तापलं आहे.

शाहू महाराज छत्रपतींविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट
शाहू महाराज छत्रपतींविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट

कोल्हापुरात महायुती व महाआघाडीकडून उमेदवारांची घोषणा झाली असून प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली असून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्याविरोधात सोशल मीडियावर कोणीतरी आक्षेपार्ह पोस्ट टाकली आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्याने कोल्हापुरातील वातावरण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत काँग्रेस नेते व आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. 

सतेज पाटील यांनी म्हटले की, शाहू महाराजांच्या विरोधात चुकीच्या व आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होत आहेत. यावर नियंत्रण न ठेवल्यास कोल्हापुरातील वातावरण बिघडू शकते. 

शाहू छत्रपती काँग्रेसच्या चिन्हावर महाविकास आघाडीकडून कोल्हापूर मतदारसंघातून लोकसभा लढवत आहेत. निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मात्र आता कोल्हापूरकरांच्या आदराचं स्थान असणाऱ्या शाहू महाराज यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्या जात असल्याने कोल्हापूरचं वातावरण तापलं आहे. 

दरम्यान कागलमध्ये आज महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचा मेळावा झाला. त्यात मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करताना म्हटले की, संजय मंडलिक यांच्यावर वैयक्तिक टीका केली जात आहे. त्यांच्यावर टीका करतानाचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहे. प्रचाराची पातळी इतकी खाली जाणार असल्याने आम्ही शाहू महाराजांना विनंती केली होती, की त्यांनी या वयात निवडणूक लढवू नये. आम्ही शाहू महाराजांचा आदर करतो. या निवडणुकीत शाहू महाराजांचं अदराचं स्थान अबाधित ठेवायचं असल्यास वैयक्तिक टीका टाळली पाहजे. आमच्यावर वैयक्तिक टीका होऊ लागल्यास आमच्याकडून याला प्रत्युत्तर दिले जाईल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर