मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manappuram finance : कोल्हापुरात मनप्पुरम फायनान्स कंपनीतील साहित्याची तोडफोड, काय आहे कारण?

Manappuram finance : कोल्हापुरात मनप्पुरम फायनान्स कंपनीतील साहित्याची तोडफोड, काय आहे कारण?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 27, 2023 12:40 AM IST

Manappuram finance company : नजरचुकीने कर्जाच्या हफ्त्याची भरलेली रक्कम परत करण्याच्या मागणीवरून कोल्हापूर शहरातील मनप्पुरम फायनान्स कंपनीच्या कार्यालयात बुधवारी तोडफोड करण्यात आली.

Manappuram finance company vandalized
Manappuram finance company vandalized

कोल्हापूर : कोल्हापुरात मनप्पुरम फायनान्स कंपनीची तोडफोड केल्याची घडना घडली आहे. एका कर्जदाराने नजरचुकीने कर्जाच्या हफ्त्याची रक्कम भरली होती. ती परत करण्याच्या मागणीवरून कोल्हापूर शहरातील मनप्पुरम फायनान्स कंपनीच्या कार्यालयात बुधवारी तोडफोड करण्यात आली. यात कंपनीतील सामानाचे मोठे नुकसान झाले असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शहरातील दाभोळकर कॉर्नर परिसरात अयोध्या टॉवरमध्ये मनप्पुरम फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या फायनान्स कंपनीकडून विविध प्रकारचा व्यावसायिक कर्जपुरवठा केला जातो. प्रदीप गरड (रा. कदमवाडी) या कर्जदाराने मोटारीसाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी कंपनीतील रुपेश पाटील यांनी संपर्क साधला.

तेव्हा गरड यांनी नजर चुकीने दोन मासिक हप्त्याची रक्कम भरली. गरड यांनी जादा भरलेली रक्कम परत मिळावी, अशी मागणी केली. मात्र पैसे ऑनलाईन भरलेले असल्याने परत मिळण्यासाठी १० दिवसांचा कालावधी लागेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

 

मात्र गरड यांना तात्काळ पैसे हवे होते. वसुलीसाठी त्रास देणाऱ्या कंपनीने नजरचुकीने आलेले पैसेही तात्काळ परत करावे, अशी त्यांची मागणी होती. कंपनीने पैसे देण्यास नकार देताचसंतप्त झालेल्या गरड यांनी दोन मित्रांसमवेत क्रिकेटच्या बॅटीच्या साह्याने कार्यालयात घुसून फर्निचरची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

IPL_Entry_Point

विभाग