मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kolhapur News: आक्षेपार्ह WhatsApp स्टेटसमुळे कोल्हापुरात तणाव; दोन गट भिडले, उद्या कोल्हापूर बंदची हाक

Kolhapur News: आक्षेपार्ह WhatsApp स्टेटसमुळे कोल्हापुरात तणाव; दोन गट भिडले, उद्या कोल्हापूर बंदची हाक

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 06, 2023 11:31 PM IST

Kolhapur news : कोल्हापुरात व्हॉट्सअप स्टेटसमुळे दोन गट आमने-सामने आले आहेत. यामुळे कोल्हापूर शहरातील रस्त्यावर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

कोल्हापुरात दोन गटात राडा
कोल्हापुरात दोन गटात राडा

शिवराज्याभिषेक दिनादिवशीच कोल्हापुरात दोन समुदायामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. काही तरुणांनी जातीय तेढ निर्माण होणारे स्टेटस सोशल मीडियावर ठेवले होते. यामुळे दोन गटात वाद निर्माण झाला. संबंधित तरुणांवर कारवाईकरण्याची मागणी करतहिंदुत्ववादी संघटनांनी शहरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला.

मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील सदर बाजार आणि अकबर मोहल्ला या परिसरातील तरुणांनी मोबाईलवर जातीय तेढ निर्माण होणारे स्टेटस ठेवल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनाआक्रमकझाल्या. त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केल्याने वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर हिंदूवादी कार्यकर्त्यांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवलेल्या तरुणाच्या घरासमोर जाऊन घोषणाबाजी केली. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठी चार्ज केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दोघा संशयितांना चौकशीसाठी तात्काळ ताब्यात घेतले आहे.

आज संपूर्ण राज्यात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना कोल्हापुरात घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. यावेळी टाऊन हॉल व बिंदू चौक तेदसरा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील काही दुकानांवर दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. शहरात काही ठिकाणी पोस्टर जाळण्याचा घटना देखील घडल्या आहेत.

 

या घटनेच्या निषेधार्थ उद्या (बुधवार) कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकत्र येणार आहेत. मात्र पोलीस प्रशासनाने सर्व हिंदुत्ववादी संघटनांना बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

IPL_Entry_Point

विभाग