Maharashtra Politics : समरजित घाटगे यांनी प्रोफाईलवरून हटवलं ‘कमळ’; शरद पवारांच्या नेतृत्वात लवकरच फुंकणार ‘तुतारी’?-kolhapur news bjp leader samarjeet ghatge removed lotus from profile likely to join ncp sharad pawar group ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Politics : समरजित घाटगे यांनी प्रोफाईलवरून हटवलं ‘कमळ’; शरद पवारांच्या नेतृत्वात लवकरच फुंकणार ‘तुतारी’?

Maharashtra Politics : समरजित घाटगे यांनी प्रोफाईलवरून हटवलं ‘कमळ’; शरद पवारांच्या नेतृत्वात लवकरच फुंकणार ‘तुतारी’?

Aug 23, 2024 12:37 AM IST

samarjeet Ghatge : समरजित घाटगे यांनी शुक्रवारी शाहू कारखाना परिसरात कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे,त्यामध्ये समरजित घाटगे यांच्या शरद पवार गटात प्रवेशाची घोषणा होऊ शकते.

समरजित घाटगे यांनी प्रोफाईलवरून हटवलं ‘कमळ’
समरजित घाटगे यांनी प्रोफाईलवरून हटवलं ‘कमळ’

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल विधानसभा मतदारसंघातील राजकारण तापलं आहे. येथे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमधील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे (samarjeet Ghatge) यांनी भाजपला राम राम ठोकत शरद पवार गटात सामील होण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर असतानाच समरजित घाटगे यांनी सोशल मीडिया हॅण्डलवरून कमळ हटवलं आहे. आपल्या सोशल मीडिया वॉलवर वारसा शाहूंचा,लढा सर्वसामान्यांचा असं लिहिलं आहे.

महायुतीच्या मेळावा सुरू होण्याआधीच समरजित घाटगे यांनी कमळ हटवल्यामुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान समरजित घाटगे यांनी शुक्रवारी शाहू कारखाना परिसरात कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे,त्यामध्ये समरजित घाटगे यांच्या शरद पवार गटात प्रवेशाची घोषणा होऊ शकते.

याआधी भाजपचे राज्यसभा खासदार मुन्ना उर्फ धनंजय महाडिक यांनी बुधवारी समरजित घाटगे यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर धनंजय महाडिक यांनी माध्यमांना सांगितले की, आम्ही समरजीत घाडगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना एकदा देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन चर्चा करावी. पक्षातच रहावे काही ना काही मार्ग निघेल असे सांगितले आहे. इतक्या लवकर पक्ष सोडण्याचा निर्णय न घेता आणखी काही राजकीय घडामोडी विधानसभा निवडणुकीपर्यंत घडतात का?याचा अंदाज घेऊन मगच निर्णय घ्यावा,असं भाजपचं मत आहे. मात्र ज्या पक्षांचा आमदार तेथे त्यांनाच तिकीट देण्याचा निर्णय झाल्यामुळे त्यांचा नाईलाज आहे. त्यांनी गेल्या ८ वर्षापासून मतदारसंघात तयारी केली आहे.

अजित पवार गटाकडून कागल मतदारसंघात हसन मुश्रीफ यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे विधानसभा निवडणुकीत कागलमधून तिकीट मिळण्याची शक्यता कमी असल्याने समरजितसिंह घाटगे भाजपला रामराम करण्याच्या तयारीत आहेत. ३ सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये कागलमधल्या मेळाव्यात घाटगे पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा सुरू आहे.

 

गेल्या निवडणुकीत समजजीत घाडगेंनी अपक्ष निवडणूक लढत ८८ हजाराहून अधिक मतं मिळवली होती.  त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवारानेही चांगली मते मिळवली होती. तिरंगी लढत झाल्यानं मुश्रीफ विजयी झाले होते. मात्र आता जर थेट लढत झाली तर तुल्यबळ मुकाबल्याची अपेक्षा आहे. मुश्रीफ यांनी सत्ताधारी पक्षात सामील होण्याचा निर्णय घेऊन मंत्रिपद मिळवले होते, तेव्हा घाटगे १० दिवस नॉट रिचेबल झाले होते. त्यांची पत्नीही कागलमधून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.