Kolhapur Murder : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पुण्याप्रमाणेच कोल्हापूर येथे देखील खून दरोडे या सारख्या घटना वाढल्या आहेत. कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी एहतील एका चांदी व्यापाऱ्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. धार धार शस्त्राने छातीत वार करून ही हत्या करण्यात आली आहे. या सोबतच त्यांच्या दुकानातील २५ किलो चांदी देखील लंपास करण्यात आली आहे. ब्रह्मनाथ सुकुमार हालोंढे असे या खून झालेल्या चांदीच्या व्यापाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा धाकट्या भावाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी भाऊ प्रवीण सुकुमार हालुंडे याला संशयित म्हणून हुपरी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ब्रह्मनाथ सुकुमार हालोंढे यांचा मृतदेह ताब्यात घेतला शवविच्छेदनासाठी तो शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ही घटना हुपरी येथील पंचतारांकित औद्यागिक वसाहतीतील सिल्व्हर झोनमध्ये रविवारी संध्याकाळी घडली. हालुंडे यांची हत्या केल्यावर आरोपीने यांच्या घरातील कपाटातील १५ लाख रुपये किमतीचे चांदी व काही दागिने लंपास केले.
कोल्हापुरातील हुपरी येथील पंचतारांकित औद्यागिक वसाहतीतील सिल्व्हर झोन येथे ब्रह्मनाथ हालुंडे हे त्यांच्या आई वडिलांसोबत राहत होते. त्यांचा चांदीचा व्यवसाय होता. जशी ऑर्डर मिळेल तसे ते चांदीचे दागिने तयार करून देत असत. दरम्यान, शनिवारी त्यांचे आई वडील ही त्यांच्या मूळ गावी निपाणी येथे गेले होते. यावेळी ब्रह्मनाथ घरी एकटाच होता. रविवारी ही संधी साधून काही हल्लेखोरांनी त्याच्यावर दुपारच्या सुमारास शिरून त्याची धारदार शस्त्राने हत्या केली. यात ब्रह्मनाथ हालुंडेचा जागीच मृत्यू झाला. आरोपींनी तिजोरीतील १५ लाख रुपये किमतीची चांदी व दागिने चोरून नेले.
रविवारी सायंकाळी त्याचे आई वडील घरी आल्यानंतर घराचा दरवाजा उघडाअसल्याचे त्यांना दिसले. ते घरात आले असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात मुलाचा मृतदेह पडलेला दिसला. हे पाहून दोघांनीही मोठ्याने रडण्यास सुरुवात केली. त्यांच्या आवाजामुळे शेजारीही देखील घरात आले. याची माहिती पोलिसांना त्यांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. ठसे तज्ञ व श्वान पथकाच्या साह्याने आरोपीचा शोध घेतला जात आहे.
या प्रकरणी पोलिसांनी संशयित म्हणून ब्रह्मनाथ हालुंडे याच्या धाकट्या भावाला अटक केली आहे. ब्रह्मनाथ हा अविवाहित व धार्मिक प्रवृत्तीचा होता. ब्रह्मनाथ व त्याचा भाऊ यांच्यात कौटुंबिक वाद होते. यामुळे दोघेही वेगवेगळे राहत होते. यामुळे त्याचा भाऊ प्रवीण सुकुमार हालुंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.