Kolhapur Chandgad MLA Public Rally fire Incident : राज्यात विधानसभा निवडणुकांचे चित्र स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. ठीकठिकाणी विजयाचा जल्लोष सुरू आहे. मात्र, चंदगडमध्ये नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांच्या विजयी मिरावणुकी दरम्यान, अंगावर काटा आणणारी दुर्घटना घडली आहे. या घटनेत पाटील हे थोडण्यात बचावले आहेत. व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. पाटील यांच्या विजयाचा जल्लोष सुरू होता. यावेळी जेसीबीने गुलाल उधळण्यात आला. गुलाल टाकताच मोठा आगीचा भडका उडाला. या घटनेत जल्लोष करणारे कार्यकर्ते व महिला जखमी झाल्या आहेत. तर शिवाजी पाटील देखील या आगीपासून थोडक्यात बचावले आहे.
चंदगड विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी २४,१३४ इतक्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. या मतदारसंघात त्यांनी ८४,२५४ मतं मिळवली आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या (अजित पवार) नागेश पाटील (६०,१२० मतं) व राष्ट्रवादीच्या (शरद पवार) नंदाताई बाभूळकर-कुपेकर (४७,२५९ मतं) यांचा पराभव केला आहे.
कोल्हापुराच्या चंदगड मतदारसंघातून शिवाजी पाटील हे निवडून आहे आहेत. यावेळी कार्यकर्ते जल्लोष करत होते. शिवाजी पाटील यांची रात्री विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात त्यांचे कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाल्या होत्या. ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्ते जल्लोष करत होते.
यावेळी जेसीबीने गुलाल उधळला जात होता. यावेळी शिवाजी पाटील हे देखील जल्लोषात सहभागी झाले होते. यावेळी काही महिला या शिवाजी पाटील यांचे औक्षण करण्यासाठी दिव्याचे ताट घेऊन उभ्या होत्या. शिवजी पाटील हे महिलांकडून औक्षण करून घेत असतांना जेसीबीने त्यांच्या अंगावर गुलाल उधळळण्यात आला. यावेळी अचानक मोठा आगीचा भडका उडाला. या आगीत औक्षण करणाऱ्या महिला होरपळल्या तर शिवाजी पाटील हे देखील थोडक्यात बचावले.
ही संपूर्ण घटना व्हिडिओत कैद झाली आहे. जेसीबीने गुलाल टाकताच मोठा भडका उडल्याचे व्हिडिओत दिसत आहे. भडका उडताच कार्यकर्ते सैरावैरा पळू लागले. शिवाजी पाटील देखील पळाले. जखमी नागरिकांना दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.