मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कोल्हापूर: आदमापुरातील बाळूमामा देवस्थान ट्रस्ट बरखास्त; प्रशासकाने स्वीकारला कारभार

कोल्हापूर: आदमापुरातील बाळूमामा देवस्थान ट्रस्ट बरखास्त; प्रशासकाने स्वीकारला कारभार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 25, 2023 10:11 PM IST

Balumama Devasthan Trust : आदमापुरातील बाळूमामा देवस्थान समिती अखेर बरखास्त करण्यात आली असून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

Balumama Devasthan Trust
Balumama Devasthan Trust

श्री क्षेत्र आदमापुरातील बाळूमामा देवस्थान समिती अखेर बरखास्त करण्यात आली असून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. गैरकारभार आणि विश्वस्त नेमणुकीवरुन बाळूमामा देवस्थान ट्रस्ट वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. अखेर हे ट्रस्ट बरखास्त करण्यात आले आहे. शिवराज नायकवडी यांची प्रशासक पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी मंदिर कामकाज पाहण्यास आजपासून सुरुवात केली. नायकवडींनी एम. के. नाईक व सत्यनारायण शेनॉय या धर्मादाय निरीक्षकांसमवेत कामकाजाला सुरुवात केली.

आमदापूर येथील बाळूमामा मंदिराचे व्यवस्थापन पाहण्यासाठी बाळूमामा देवस्थान ट्रस्ट कार्यरत आहे. देवस्थान ट्रस्टच्या दोन गटात अधिकृत कोण यावरून वाद सुरु होता. ट्रस्टी नेमणूक आणि मंदिरामध्ये सुरू असलेल्या गैरकारभाराविरोधात आदमापूरचे सरपंच विजय गुरव यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारही दाखल केली आहे. या संदर्भात त्यांच्यावर हल्लाही करण्यात आला होता. त्यांच्या विरोधातील मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले व त्यांच्या साथीदारांनी त्यांच्यावर भररस्त्यात हल्ला केला होता. 

यावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदारानी शांतता समितीची बैठक बोलावली होती. तेथेही संघर्ष उफाळून आला. अखेर बाळूमामा देवस्थान समितीवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. शिवराज नायकवडी यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये काम केले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर तिघा प्रशासकांनी पहिल्याच दिवशी कामाला सुरुवात केली.

IPL_Entry_Point

विभाग