Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! भरधाव ट्रकची बोलेरोला धडक; ३ ठार, ४ जण जखमी-kolhapur accident three youths killed in truck bolero collision in radhanagari ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! भरधाव ट्रकची बोलेरोला धडक; ३ ठार, ४ जण जखमी

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! भरधाव ट्रकची बोलेरोला धडक; ३ ठार, ४ जण जखमी

Sep 11, 2024 02:21 PM IST

Truck-Bolero Collision In Kolhapur: कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यात भरधाव ट्रक आणि बोलेरो यांच्यात भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली.

कोहापुरात भरधाव ट्रकची बोलेरोला धडक
कोहापुरात भरधाव ट्रकची बोलेरोला धडक

Kolhapur Accident News: कोल्हापूरमधील राधानगरी तालुक्यात भीषण अपघात घडला. भरधाव ट्रकने बोलेरोला दिलेल्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली. ऐन गणेशोत्सवाच्या काळात ही दुर्घटना घडल्याने गावकऱ्यांवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निपाणी देवगड राज्य महामार्गावर सरवडे-मांगेवाडी दरम्यान बुधवारी मध्यरात्री भरधाव ट्रकने बोलोरोला भीषण धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. तर, चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर मदत करण्याऐवजी ट्रकचालक घटनस्थळावरून पसार झाला. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केली.

शुभम चंद्रकांत धावरे (वय, २८), आकाश आनंदा परीट (वय, २३) आणि रोहन संभाजी लोहार (वय, २४) अशी मृतांची नावे आहेत. तर, ऋत्विक राजेंद्र पाटील, भरत धनाजी पाटील, सौरभ सुरेश तेली आणि संभाजी लोहार या चौघांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नागपूर- उमरेड मार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात; ४ जण ठार

नागपूर-उमरेड मार्गावर भिवापूरजवळ गुरुवारी दुपारच्या सुमारास ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १० ते १२ जण जखमी झाले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासगी ट्रॅव्हल्स बसने रस्त्यावर उभा असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या घटनेत एक महिला आणि एक मुलासह चार जणांचा मृ्त्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यातील १० प्रवाशांना नागपूरला हलवण्यात आली.

Whats_app_banner
विभाग