Ganpati Special Train: बाप्पा पावला रे! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या स्पेशल गाड्या; कधी सुरू होणार तिकीट बुकिंग?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ganpati Special Train: बाप्पा पावला रे! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या स्पेशल गाड्या; कधी सुरू होणार तिकीट बुकिंग?

Ganpati Special Train: बाप्पा पावला रे! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या स्पेशल गाड्या; कधी सुरू होणार तिकीट बुकिंग?

Jul 20, 2024 03:06 PM IST

Kokan Ganpati Special Train: मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आगामी गणेशोत्सव लक्षात घेऊन कोकण रेल्वेने कोकणासाठी एकूण सात विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या स्पेशल गाड्या; कधी सुरू होणार तिकीट बुकिंग?
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या स्पेशल गाड्या; कधी सुरू होणार तिकीट बुकिंग?

Kokan Ganpati Special Train: गणपती म्हटलं की, मुंबईत राहणाऱ्या सगळ्यांनाच आपल्या कोकणातील घराची आठवण येऊ लागते. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाण्यासाठी रेल्वेची तिकीट मिळणे तसे कठीण असते. मात्र, यावर्षी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आहे. आगामी गणेशोत्सव लक्षात घेऊन कोकण रेल्वेने एकूण सात विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. २१ जुलै रोजी सकाळी ८ वाजल्यापासून या गाड्यांचे बुकिंग सुरू होणार आहे. कोकण रेल्वेच्या या पाऊलामुळे गणेशोत्सव काळात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई सीएसएमटी-सावंतवाडी डेली स्पेशल (३६ फेऱ्या) ०११५१

मुंबई सीएसएमटी-सावंतवाडी स्पेशल ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) दररोज ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ०१.२४ वाजता सावंतवाडीला पोहोचेल. तर, सावंतवाडी येथून ०१.०९.२०२४ ते १९.०९.२०२४ (१८ फेऱ्या) दररोज १५.१० वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला दुसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता पोहोचेल.

ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या ठिकाणी थांबेल.
 

मुंबई सीएसएमटी-रत्नागिरी डेली स्पेशल (एकूण ३६ फेऱ्या) ०११५३

मुंबई सीएसएमटी-रत्नागिरी डेली स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) दररोज सकाळी ११.३० वाजता निघेल आणि त्याच दिवशी रत्नागिरीला २०.१०ला पोहोचेल. तर, रत्नागिरी येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ ट्रिप) दररोज पहाटे ४ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १३.३०वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.

ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड या ठिकाणी थांबेल.
 

एलटीटी-कुडाळ डेली स्पेशल (३६ फेऱ्या) ०११६७

एलटीटी-कुडाळ डेली स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) दररोज रात्री २१.०० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.३० वाजता कुडाळला पोहोचेल. तर, कुडाळ येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ ट्रिप) दररोज दुपारी १२.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ००.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईला पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, मानगांव, वीर, खेड़, अंजनी, चिपलून, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापुर रोड, वैभववाड़ी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग या ठिकाणी थांबेल.
 

मुंबई स्पेशल एलटीटी-सावंतवाडी डेली स्पेशल (३६ फेऱ्या) ०११७१

मुंबई स्पेशल एलटीटी-सावंतवाडी डेली स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) दररोज सकाळी ८.२० वाजता येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१.०० वाजता सावंतवाडीला पोहोचेल. तर, सावंतवाडी येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) दररोज रात्री २२.२०वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४० वाजता एलटीटी मुंबईला पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, मानगांव, वीर, खेड़, चिपलून, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापुर रोड, वैभववाड़ी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग येथे थांबेल.
 

दिवा चिपळूण मेमू स्पेशल (एकूण ३६ फेऱ्या) ०११५५

दिवा चिपळूण मेमू स्पेशल दिवा येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) दररोज सकाळी ०७.१५ वाजता निघेल आणि त्याच दिवशी दुपारी १४.०० वाजता चिपळूणला पोहोचेल. तर, चिपळूण येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) दररोज १५.३०वाजता निघेल आणि त्याच दिवशी २२.५० वाजता दिवा येथे पोहोचेल.

ही गाडी दिवा, निकाळजे, तळोजा, कळंबोली, पनवेल, सोमटणे, रसायनी, आपटा, जित, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाडो, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, सापेवामने, करंजाडी, विन्हेरे, कळंबोली, खेड अंजनी या ठिकाणी थांबेल.
 

एलटीटी-कुडाळ स्पेशल (१६ फेऱ्या) ०११८५

एलटीटी-कुडाळ स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०२.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (८ फेऱ्या) सोमवार, बुधवार आणि शनिवारी रात्री ००:४५ वाजता सुटेल आणि दिवशी १२.३० कुडाळला पोहोचेल. तर, कुडाळ येथून सोमवार, बुधवार आणि शनिवारी ०२.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (८ फेऱ्या) दरम्यान संध्याकाळी १६.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईला पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, मानगांव, वीर, खेड़, चिपलून, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापुर रोड, वैभववाड़ी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग या ठिकाणी थांबेल.
 

एलटीटी कुडाळ स्पेशल (६ फेऱ्या सेवा) ०११६५

एलटीटी कुडाळ स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०३.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (३ फेऱ्या) दरम्यान मंगळवारी ००.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १२.३० वाजता कुडाळला पोहोचेल. तर, कुडाळ येथून ०३०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (३ फेऱ्या) दरम्यान मंगळवारी संध्याकाळी १६.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईला पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, मानगांव, वीर, खेड़, चिपलून, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापुर रोड, वैभववाड़ी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग येथे थांबेल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर