Know About INS Surat, Nilgiri and Vaghsheer: आजचा दिवस (१५ जानेवारी २०२४) हा देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. भारतीय नौदलाच्या ताफ्यात एकाचवेळी ३ शक्तीशाली युद्धनौकांचा दाखल होणार आहेत, ज्यात आयएनएस निलगिरी, सुरत आणि वाघशीर यांचा समावेश आहे. भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढवणाऱ्या तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण आज होणार आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता मुंबईतील नौदल गोदीत आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी या युद्धनौकांचे, तर आयएनएस वाघशीर या पाणबुडीचे राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. '१५ जानेवारी हा आपल्या देशाच्या नौदल क्षमतेच्या दृष्टीने विशेष दिन ठरणार आहे. नौदलाच्या तीन युद्धसज्ज युद्धनौकांचे एकाचवेळी कमिशनिंग होणे ही संरक्षणाच्या जागतिक नेतृत्त्वाकडे तसेच स्वयंपूर्ण होण्याच्या दिशे होणारी एक सक्षम वाटचाल आहे', असे या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'वर पोस्ट केले आहे.
- या युद्धनौकेची लांबी १६४ मीटर आहे.
- स्टलेथ फिचर्स आणि अत्याधुनिक रडारने सुसज्ज
- जमिनीवर आणि हवेत मारा करण्याची क्षमता
- मिसाइल्स, टॉरपीडो आणि अन्य शस्त्रांनी सुसज्ज
- आयएनएस नीलगिरी ही भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17ए अंतर्गत बनवण्यात आलेली पहिली स्टेल्थ फ्रिगेट आहे.
- ही युद्धनौका १४९ मीटर लांब आहे.
- नीलगिरीला ब्लू वॉटर ऑपरेशनसाठी डिझाइन करण्यात आले आहे.
- पारंपरिक आणि अपारंपरिक धोक्यांचा सामना सक्षम.
- जमिनीवर आणि हवेत मारा करण्याची क्षमता.
- इंटीग्रेटेड प्लेटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टमने सुसज्ज.
- भारतीय नौदलाच्या स्कॉर्पीन-क्लास प्रोजेक्ट 75 अंतर्गत निर्मिती करण्यात आलेली सहावी आणि शेवटची डीजेल-इलेक्ट्रिक सबमरीन आहे.
- शत्रुच्या प्रदेशात गुप्तपणे काम करण्यासाठी ही पाणबुडी डिझाइन करण्यात आली.
- वाघशीर ६७ मीटर लांब आणि १ हजार ५५० किलो वजनाची आहे.
- वाघशीरमध्ये एंटी-शिप मिसाइल आणि अत्याधुनिक सोनार सिस्टम आहे.
- समुद्राच्यावर आणि माण्याच्या खाली मारा करण्याची क्षमता.
संबंधित बातम्या