डॉमिनोजच्या पिझ्झा मध्ये आढळला चाकूचा तुकडा! पुण्यातील पिंपरी-चिंचवड मधील प्रकार, आधी टाळाटाळ मग केलं मान्य
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  डॉमिनोजच्या पिझ्झा मध्ये आढळला चाकूचा तुकडा! पुण्यातील पिंपरी-चिंचवड मधील प्रकार, आधी टाळाटाळ मग केलं मान्य

डॉमिनोजच्या पिझ्झा मध्ये आढळला चाकूचा तुकडा! पुण्यातील पिंपरी-चिंचवड मधील प्रकार, आधी टाळाटाळ मग केलं मान्य

Jan 05, 2025 07:05 AM IST

Knife Piece Found In Pizza : पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे पिझा खातांना त्यात चक्क चाकूचा तुकडा सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार शुक्रवारी आढळून आला आहे. ज्यांनी हा पिझा ऑर्डर केला होता, त्यांनी या घटनेचा व्हिडिओ काढला असून तो सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे,

डॉमिनोजच्या पिझ्झा मध्ये आढळला चाकूचा तुकडा! पुण्यातील पिंपरी-चिंचवड मधील प्रकार, आधी टाळाटाळ मग केलं मान्य
डॉमिनोजच्या पिझ्झा मध्ये आढळला चाकूचा तुकडा! पुण्यातील पिंपरी-चिंचवड मधील प्रकार, आधी टाळाटाळ मग केलं मान्य

Knife Piece Found In Pizza : पिझा हा अनेकांच्या आवडीचा प्रकार. काही जण एक वेळ जेवणार नाही. मात्र, पीझा आवडीने खाणार. आजकालच्या तरुणाईला या फास्टफूडने अक्षरक्ष: वेड लावले आहे. पण, पीझा लव्हरसाठी अत्यंत धक्कादायक बातमी पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथून पुढे आली आहे. जर तुम्ही पिझ्झा लव्हर असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कारण एका ग्राहकाणे ऑर्डर केलेल्या पिझ्झामध्ये अक्षरशः चाकूचां तुटलेला तुकडा सापडला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरातील इंद्रायणी नगरयेथे डॉमिनोज पिझ्झामध्ये हा चाकूचां तुटलेला तुकडा आढळून आला आहे. शुक्रवारी रात्री हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

काय आहे प्रकार ?

मिळालेल्या माहितीनुसार इंद्रायणी नगरमध्ये राहणाऱ्या अरुण कापसे या व्यक्तीने आपल्या कुटुंबीयांसाठी शुक्रवारी रात्री जय गणेश साम्राज्य चौकातील डॉमीनोज मधून पिझ्झा इथून ५९६ रुपये किमतीचा एक पिझ्झा ऑनलाइन ऑर्डर केला होता. पिझ्झा आल्यानंतर आपल्या कुटुंबीयांसोबत पिझ्झाचा आस्वाद घेत असताना, अरुण कापसे यांच्या दातात अक्षरशः पिझ्झा कट करणाऱ्या चाकूच्या तुटलेला तुकडा घुसला होता. अरुण कापसे यांनी आपल्या सोबत घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक असल्याने त्यांनी लगेच डोमिनोज पिझ्झाच्या मॅनेजरला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला. सुरुवातीला त्यांना डोमिनोज पिझ्झाच्या मॅनेजर कडून उडवा उडवीची उत्तर देण्यात आली. मात्र मॅनेजरने घरी येऊन पिझातील तुटलेला चाकूचा तुकडा बघितल्यानंतर त्याला देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. या सर्व प्रकारानंतर डॉमिनोज पिझ्झा कडून अरुण कापसे यांना त्यांच्या पिझ्झाच्या ऑर्डरचे पैसे लगेच परत करण्यात आले आहेत. मात्र नागरिकांच्या आरोग्याशी, खेळ खेळणाऱ्या डॉमिनोज पिझ्झा विरोधात अरुण कापसे यांनी पुणे जिल्हा अन्न व औषध विभाग प्रशासनाकडे तक्रार केली आहे.

समोस्यात आढळले होते कंडोम ?

या पूर्वी पिंपरी-चिंचवड परिसरात एका कंपनीच्या कँटिनमध्ये समोस्यात चक्क कंडोम सापडले होते. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. यामुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दरम्यान, ही घटना व्यावसायिक स्पर्धेतून करण्यात आल्याचे तपासात उघड झाले होते. कंपनीच्या कँटिनचे कंत्राट मिळाले नसल्याने आरोपीने कंपनीत आपल्या आचारी पाठवून हे कृत्य केल्याचे उघड झाले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर