मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  pune lonikalbhor crime : जेवणाचा टेबल सरकवण्यास सांगितल्याने वर संतपला! थेट कट्यारीने केला मंगल कार्यालय चालकावर वार

pune lonikalbhor crime : जेवणाचा टेबल सरकवण्यास सांगितल्याने वर संतपला! थेट कट्यारीने केला मंगल कार्यालय चालकावर वार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 09, 2024 01:56 PM IST

Pune lonikalbhor crime : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ वादातून वराने कट्यारीच्या साह्याने कार्यालय मालकावर वार केला.

Pune lonikalbhor crime
Pune lonikalbhor crime

pune lonikalbhor crime : पुण्यात एका मंगल कार्यालय मालकाला जेवणाच्या टेबलवरुन वराला बोलणे महागात पडले आहे. विवाह समारंभात किरकोळ वादातून चिडलेल्या वराने थेट मंगल कार्यालय चालकावर कट्यारीने वार केला. ही घटना लोणी काळभोर भागातील एका मंगल कार्यालयात सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी वरासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतापजनक! धावत्या बसमध्ये कंडक्टरं केला प्रवासी महिलेवर बलात्कार

अभिजीत राजू मिरगणे, राहुल रमेश सरोदे, दत्ता यांच्यासह पाच ते सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी करण दीपक सणस (वय २७, रा. उरूळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सणस यांचे पुणे-सोलापूर रस्त्यावरील उरूळी कांचन परिसरात श्रीकृष्ण मंगल कार्यालय आहे.

Bengaluru: गोव्यात बेंगळुरूच्या सीईओनं केली ४ वर्षांच्या पोटच्या मुलाची हत्या; असे झाले हत्याकांड उघड

विवाह समारंभ आटोपल्यावर वर अभिजीत मिरगणे आणि नातेवाईक रात्री साडेआठच्या सुमारास स्टेजजवळ टेबल-खुर्ची ठेवून मां जेवण करत होते. दरम्यान, त्यामुळे तेथून ये-जा करता येत नसल्याने मंगल कार्यालय चालक सणस याने अभिजीत आणि नातेवाईकांना टेबल-खुर्ची सरकावण्यास सांगितले. मात्र, मालकाचे हे बोलणे टोचल्याने वर अभिजीतचा संताप झाला. त्याने आणि त्याच्याबरोबर असलेल्या नातेवाईकांनी कार्यालय मालक सणस यांच्याशी वाद घातला. हा वाद टोकाला गेला.

संतपलेल्या अभिजीतने सणस यांना शिवीगाळ करत थेट त्याच्याजवळ असणाऱ्या कटयारीने त्याच्या हातावर वार केला. दरम्यान, कट्यारीला धार नसल्याने सणस बालंबाल बचावले. या हल्ल्यात त्यांना किरकोळ दुखापत झाली. यानंतर देखील अभिजीत आणि त्याच्या मित्रांनी मंगल कार्यालयात गोंधळ घातला. दरम्यान, सणस यांनी पोलिसांना याची माहिती देत गुन्हा दाखल केला.

WhatsApp channel