मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kirit Somaiya on Sanjay Raut : "..तोपर्यंत संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड जेल राहणार"

Kirit Somaiya on Sanjay Raut : "..तोपर्यंत संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड जेल राहणार"

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 08, 2022 10:31 PM IST

संजय राऊत यांचामुक्काम नवाब मलिक यांचे शेजारी बनून आर्थर रोड जेलमध्ये राहणार असल्याचे भाकित सोमय्या यांनी केले आहे.

संजय राऊत व किरीट सोमय्या
संजय राऊत व किरीट सोमय्या

मुंबई – शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केली आहे. संजय राऊत यांनाआज मुंबई सेशन कोर्टाने २२ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे आता त्यांचा पुढील मुक्काम हा मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात (Arthur road jail) असणार आहे. येथेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुखही शिक्षा भोगत आहेत. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.संजय राऊत यांचा मुक्काम नवाब मलिक यांचे शेजारी बनून आर्थर रोड जेलमध्ये राहणार असल्याचे भाकित सोमय्या यांनी केले आहे.

"आता संजय राऊतांचा मुक्काम नवाब मलिक (nawab malik) यांचे शेजारी बनून आर्थर रोड जेलमध्ये राहणार. सध्या तर पत्रा चाळ घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. वसई २००० कोटींचा पर्ल ग्रुप घोटाळा, दुबईमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये बिल्डर्स मंडळींसोबत बैठका, चीन दौरा... या घोटाळ्यांची चौकशी होईपर्यंत संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड जेल रहणार, असे मला वाटते," असे सोमय्या यांनीम्हटले आहे.

यापूर्वी न्यायालयाने संजय राऊतांना ईडीची कोठडी सुनावली होती. ती आज संपली. यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. मात्र, यावेळी ईडीने राऊतांच्या चौकशीसाठी ईडी कोठडी मागितली नाही.  यामुळे कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

IPL_Entry_Point