Goregaon murder news : बदलापूर जवळील गोरेगाव येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका ९ वर्षीय मुलाचे खंडणीसाठी अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एकाच कुटुंबातील तब्बल ७ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी तब्बल २० लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती. मात्र, ती न दिल्याने मुलाची हत्या करण्यात आली. आरोपी हे मृत मुलाचे शेजारी असल्याची देखील माहिती आहे.
इबाद बुबेरे (वय ९) असे खून करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी मुलाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुळगाव पोलिसांनी एकाच कुटुंबातील सात आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
या घटनेचे वृत्त असे की, बदलापूर कर्जत राज्यमार्ग असलेल्या गोरेगाव येथून इबादचे अपहरण करण्यात आले होते. इबाद हा दोन दिवसांपूर्वी रमजान निमित्त मशिदीत नमाज पठण करण्यासाठी गेला होता. मात्र, तो बराच वेळ होऊनही घरी परत आला नव्हता. यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी इबादचा शोध घेण्यास सूरवत केली.
यावेळी एका आरोपीने इबादच्या इबादच्या वडिलांना फोन करून तुमचा मुलगा तुम्हाला जिवंत पाहिजे असल्यास २० लाख रुपये खंडणी मागितली. दरम्यान, फोन करणाऱ्या व्यक्तीने फोन बंद केला. दरम्यान, ही बाब पोलिसांना देखील समजली. पोलिस देखील इबाद आणि आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, अपहरणकर्त्याने दुसरे सीम कार्ड टाकून इबादच्या वडिलांना फोन केला. यावेळी पोलिसांना आरोपीची आणि त्याच्या ठाव ठिकाण्याची माहिती मिळाली. पोलिसांनी लोकेशन नुसार गोरेगाव येथील सलमान मौलवीचा शोध सुरु केला.
मात्र, तपसा दरम्यान, सलमान मौलवीच्या घराच्या मागच्या बाजूला एका खड्ड्यात पोत्यात इबादचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तपास आणखी वेगाने पुढे नेत आरोपी सलमान, सफूयान यांच्यासह पाच जणांना अटक केली. दरम्यान, त्यांनीच २० लाख रुपयांच्या खंडणीसाठी ईबादचे अपहरण करून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिस पथक तपास करत आहेत.