मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune boy murder : पुणे हादरले! ढोल ताशा पथकात सरावासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचे आधी अपहरण, नंतर खून

Pune boy murder : पुणे हादरले! ढोल ताशा पथकात सरावासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचे आधी अपहरण, नंतर खून

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 06, 2023 11:38 AM IST

Pune kondhva crime : पुण्यात ढोलताशांचा सराव सुरू आहे. मोठ्या प्रमाणात तरुणाई या सरावासाठी जात आहे. मात्र, अशाच एका वादातून ढोल वादनासाठी गेलेल्या एका तरुणाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

crime news
crime news

Pune boy murder : पुण्यात ढोलताशांचा सराव सुरू आहे. मोठ्या प्रमाणात तरुणाई या सरावासाठी जात आहे. मात्र, अशाच एका वादातून ढोल वादनासाठी गेलेल्या एका तरुणाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रतिस्पर्धी टोळीला माहिती दिल्याच्या संशयावरुन त्याचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

ITC : पॅकेटमध्ये १ बिस्किट कमी देणे पडले महागात! आयटीसीला मोजवे लागणार तब्बल १ लाख! काय आहे प्रकरण?

साईराज लोणकर (वय २५, रा. कोंढवा खुर्द), ओंकार कापरे (वय २५, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणकर, कापरे हे सराइत गुन्हेगार आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दहा ते अकरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन आरोपी हे अल्पवयीन असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

India vs Bharat Controversy : इंडिया नाही भारत, सरकारी पुस्तिकेत मोदींचा उल्लेख बदलला

खून झालेला अल्पवयीन मुलगा हा कोंढव्यातील शिवनेरीनगर भागात राहतो. शनिवारी (दि २) तो ढोल ताशा पथकात सरावासाठी गेला.. रात्री उशीरापर्यंत तो घरी न परतल्याने रविवारी त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार कोंढवा पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तेव्हा अल्पवयीन मुलाबरोबर गेलेला एकजण बेपत्ता झाला असून तो घरी परतला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस त्याच्या घरी गेले असता त्या मुलाच्या पायाला मार लागला होता.

त्याची चौकशी केली असता अल्पवयीन मुलाचे लोणकर आणि कापरे यांनी अपहरण करुन त्याला सासवड येथे नेऊन मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह तेथे टाकून आरोपी फरार झाले. कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली. आहे. तसेच दोन अल्पवयीन साथीदारांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

WhatsApp channel