मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kia Sonet: सर्वात प्रीमियम आणि १९ व्हेरिएंटसह नवीन किया सोनेट भारतात लॉन्च!

Kia Sonet: सर्वात प्रीमियम आणि १९ व्हेरिएंटसह नवीन किया सोनेट भारतात लॉन्च!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 12, 2024 09:31 PM IST

Kia Upcoming Car: किया कंपनीची नवी कार भारतात लॉन्च झाली.

Kia Sonet Car
Kia Sonet Car

Kia Sonet facelift Car: भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी कियाने आपली सर्वात प्रीमियम कॉम्पॅक्ट एसयूव्ही किया सोनेट लॉन्च केली आहे. या कारची एक्स शो रुम किंमत ७. ९९ लाख इतकी आहे. डिसेंबर २०२३ मध्ये अनावरण करण्यात आलेल्या कियाच्या या दुसऱ्या क्रमांकाच्या बेस्ट-सेलिंग नव्या कारमध्ये २५ सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत.

या कारमध्ये ग्राहकांना फाइंड माय कार विथ एसव्हीएमसह ७० पेक्षा जास्त कनेक्टेड कार फीचर्स मिळत आहेत. ही कार १९ वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. या कारच्या डिझेल मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत ९.७९ हजारापासून सुरू होते. जीटी लाइन आणि एक्स-लाइन व्हेरीयन्टची किंमत पेट्रोलमध्ये अनुक्रमे १४.५० लाख आणि १४.६९ लाख रुपये आहे. तर डिझेलमध्ये १५.५० लाख आणि १५.६९ लाख रुपये आहे. ग्राहक किया इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवरुन तसेच किया इंडियाच्या अधिकृत डीलरशिपद्वारे ही कार अवघ्या २५ हजारांत बूक करू शकतात.

किया इंडियाचे चीफ सेल्स आणि बिझनेस स्ट्रॅटजी अधिकारी म्युंग-सिक सोन म्हणाले की, “नवीन सोनेट दाखल करून आम्ही पुन्हा कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेन्टला प्रीमियम बनवत आहोत. जुन्या सोनेटने डिझाईनने आणि तांत्रिक क्षमतेने ग्राहकांना आकर्षित केले. किया कार ही सर्वाधिक कनेक्टेड कार आहे. त्यात मजेदार हिंग्लिश कमांड आणि सराऊंड व्ह्यू मॉनिटर सारखी फीचर्स आहेत."

सोनेटमध्ये या सेगमेन्टमध्ये सर्वोत्तम अशी १० फीचर्स आहेत, जशी की ड्युअल स्क्रीन कनेक्टेड पॅनल डिझाईन, रियर डोर सनशेड कर्टन आणि सर्व दारांना सुरक्षेसह पॉवर विंडो वन टच ऑटो अप-डाऊन जवळच्या प्रतिस्पर्धींच्या तुलनेत नवीन सोनेटमध्ये त्यांच्यापेक्षा जास्त असे किमान ११ फायदे आहेत. तांत्रिक दृष्ट्या सर्वात प्रगत आणि फीचर्सने समृद्ध कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे.इन्टिरियरमध्ये १ नवीन रंगासह ५ रंगांचे पर्याय असे लक्झुरियस इन्टिरियर्स आहेत. ही कार आता ८ मोनोटोन, २ ड्युअल टोन आणि १ मॅट फिनिश कलरसह नवीन प्यूटर ऑलिव्ह बॉडी कलरमध्ये देखील उपलब्ध आहे.

WhatsApp channel

विभाग