Karuna Sharma on Dhananjay Munde : राज्यात निवडणुकीचा ज्वर वाढला आहे. ४ तारखेला अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे. तर २० तारखेला निवडणूक होऊन २३ तारखेला निकाल लागणार आहे. या निवडणुकीत अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. करुणा शर्मा यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर टीका केली आहे. इंस्टाग्रामवर त्यांनी या बाबत व्हिडिओ केला असून यात उमेदवारी अर्ज बाद झाल्याने त्या रडतांना दिसत आहेत. करुणा यांनी धनंजय मुंडेंना राक्षस म्हंटलं आहे.
करुणा शर्मा यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला. त्यांचा अर्ज बंद झाल्याने करुणा शर्मा संतापल्या आहेत. शर्मा यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर करत धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. या व्हिडिओत करुणा शर्मा म्हणाल्या, महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे. राज्यात लोकशाही राहिलेली नाही. मी परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता.
परळीत सुरु असलेल्या गुंडगिरी, अन्याय आणि अत्याचाराविरोधात मी आवाज उठवलेला होता. मला कुणाचा पाठिंबा नसताना मी माझा लढत होते. मला जनतेवर विश्वास आहे. त्यामुळेच मी परळीमधून फॉर्म भरला होता. मात्र, तो राक्षस आहे. मी त्याला २६ वर्ष त्याला स्वत:चं रक्त पाजलं. एक महिला स्वत:चं अस्तित्व गमावून, पतीचं अस्तित्व बनवत असते. मात्र, तू माझा उमेदवारी अर्ज अवैध ठरवलेला नाही तर तू स्वत:ची हार लिहून ठेवलेली आहे. तू एका महिलेला भीत असून इतिहास याचा साक्षीदार आहे. माझ्यामागे पक्षाचं व पैशांचं बळ नाही तरीही मी लढणार होते कारण माझा जनतेवर विश्वास होता. त्यामुळे मी परळी आणि बीडमधून अर्ज भरला होता. मात्र, माझा अर्ज बाद झाला, असे करुणा शर्मा यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.