पुणे : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान आता पर्यंत चार निर्णायक युद्ध झाली. या चारही युद्धात भारताने पाकिस्तानी सैन्याचा पराभव केला. यातील सर्वात शेवटचे म्हणजे आणि सर्वात उंचीवर लढले गेलेले कारगिल युद्ध. १९९९ मध्ये प्रतिकुल परिस्थितीत हे युद्ध भारतीय २६ जुलै रोजी जिंकले. जवळपास ६० दिवस हे युद्ध चालले. जाणून घेऊ यात या युद्धाचा इतिहास.
पाकिस्तानने १९४७, १९६५, १९७१ आणि १९९९ ला भारतावर आक्रमण केले. या चारही युद्धात पाकिस्तानचहा दारुण पराभव झाला. सर्वात शेवटचे युद्ध १९९९ ला कारगिल येथे लढले गेले. अतिशय प्रतिकुल परिस्थीतीत भारतीय जवानांनी हे युद्ध लढत शत्रुला पाणी पाजले होते. या युद्धाला आज २४ वर्ष पूर्ण होत आहेत. पाकिस्तानने हे युद्ध भारतावर का लादले आणि भारताने हे युद्ध कसे जिंकले याची माहिती आपण घेऊयात.
पाकिस्तानने अलबद्र या कोडनेम खाली भारतावर हे युद्ध लादले. तर आॅपरेशन विजय अंतर्गत भारताने घुसखोरांच्या रुपात आलेल्या पाकिस्तानी सैन्यांचा पराभव केला. या युद्धामुळे भारतीय सैन्यांच्या अनेक मर्यादा पुढे आल्या. असे असले तरी या निर्णायक युद्धात भारताचा विजय झाला. सर्वाधिक उंचीवर लढलेले गेलेले हे युद्ध म्हणून ओळखले जाते.
भारतासोबत १९९९ पूर्वी झालेल्या तिनही युद्धात पाकिस्तानचा पराभव झालेला. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागलेलेला. भारताला अस्थिर करण्यासाठी पाकिस्तान विविध मार्गाने प्रयत्न करत होता. पण, भारतीय लष्कराच्या जिगरबाज जवानांनी त्यांचे सगळे कट उधळून लावले. पण १९९९ मध्ये आॅपरेशन अलबद्र अंतर्गत पाकिस्तानने पुन्हा भारतावर कारगिल युद्ध लादले.
या युद्धापूर्वी दोन्ही देश हे अण्वस्त्र सज्ज झाले होते. त्यामुळे या युद्धामुळे अणूयुद्धाचे संकटही दाटून आले होते. हा तणाव कमी करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी लाहोर बस यात्रा सुरू केली आणि मैत्रीसाठी एक पाऊल पुढे टाकले. मात्र, पाकिस्तानने काही दिवसांतच घुसखोरांच्या रुपात पाकिस्तानी सैन्याला लपूनछपून नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यास सुरुवात केली.
काश्मीर आणि लडाखला जोडणारा मार्ग तोडून भारतीय जवानांना सियाचीनमधून हटवण्याचे कारस्थान आॅपरेशन बद्र अंतर्गत रचल्या गेले. या भागात तणाव निर्माण झाल्यास काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल आणि भारतावर दबाव वाढवता येईल, असे पाकिस्तान समजत होता. सुरुवातीला ही घुसखोरी भासवण्यात आली. पण पाकिस्थानचा कट उघड पडला. पाकिस्तानी सैन्याला परत माघारी धाडण्याची २ लाख जवान 'आॅपरेशन विजय' यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले. सीमा रेषा न ओलांडता हे आॅपरेशन यशस्वी कारायचे होते. तब्बल ६० दिवस हे युद्ध चालले आणि ते भारताने जिंकलेही.
आजच्याच दिवशी २४ वर्षांपूर्वी १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानच्या सैन्यांचा पुन्हा एकदा पराभव केला. या युद्धाची जबर किंमत भारतालाही मोजावी लागली. कारगिल हा भाग समुद्रसपाटीपासून १३ ते १८ हजार फूट उंचीवर आहे. उणे ३० ते उणे ४० अंश सेल्सियस तापमानात २६ जुलै १९९९ रोजी पाकिस्तानचा पराभव करण्यात आला. पण या युद्धात भारतीय लष्कराचे ५४३ अधिकारी आणि जवान शहीद झाले.
जगात सर्वात उंचीवर लढलेले गेलेले हे एकमेव युद्ध. या युद्धात भारतीय सैन्य प्रतिकुल परिस्थीत लढले आणि जिंकलेही. मे, जून आणि जुलै असे तीन महिने युद्ध चालले. टिव्हीवरून देशाने पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध ठरले. ४ मे रोजी कारगिलमधील उंच ठिकाणांवर पाकिस्तानी सैन्याने ताबा मिळवला. पाकिस्तानच्या या मोहिमेबद्दल भारतीय गुप्तचर यंत्रणा या गाफिल राहिल्या. ५ ते मे १५ या दहा दिवसांमध्ये भारतीय लष्कराच्या तुकड्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्वेक्षण केले होते. यामध्ये कॅप्टन सौरभ कालिया बेपत्ता झाले. त्यांना पाकिस्तानी सैन्याने त्यांना ठार केले. २६ मे रोजी भारतीय हवाई दलाने कारगिलमधील पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांवर हवाई हल्ले सुरु केले. श्रीनगर, अवंतीपूर आणि आदमपूर एअरबेसवरून मीग २१, मीग २३, मीग २७, जॅग्वार, मीरेज २००० या लडाकू विमानांनी पाकिस्तानी तळांवर बॉम्ब हल्ले केले. भारताने सर्वात पहिल्यांना या युद्धात लेझर गायडेट बॉम्बचा वापर केला. २७ मे रोजी भारतीय हवाई दलाचे मीग २७ विमानाला अपघात होऊन ते कारगिलमध्ये पडले. विमान कोसळण्याआधी पॅरेशूटच्या सहाय्याने विमानाबाहेर आलेल्या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने युद्ध कैदी म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर आठ दिवसांनी या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने भारताच्या ताब्यात दिले.
३१ मे रोजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिलमध्ये युद्धसदृश्य परिस्थितीची माहिती घेतली. १० जून रोजी पाकिस्तानने छिन्नविछिन्न अवस्थेतील विटंबना केलेल्या सहा भारतीय जवानांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. हे मृतदेह कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या टीममधील सैनिकांचे होते. १२ जून रोजी दिल्लीमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक निष्फळ ठरली. भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग आणि पाकिस्तानचे परराष्ट मंत्री सरताज अजीज यांची भेट दिल्लीत झाली. मात्र चचेर्नंतर पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेत भारतालाच घुसखोरांनी परत जायला हवे असे सांगितले. मात्र, भारतीय सैन्यांनी आपल्या चौक्या पुन्हा परत घेण्याचे ठरवले. १५ जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कारगिलमधून सैन्य मागे घेण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी तसे करण्यास नकार दिला. भारतीय सैनिकांनी जून २९ रोजी टायगर हिल्स येथील महत्वाच्या चौक्यांवर विजय मिळवला. ४ जुलै रोजी संपूर्ण टायगर हिल्स ताब्यात घेण्यात आली. याच्या दुस-या दिवशी ारीफ यांनी पाकिस्तान कारगिलमधून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली. २६ जुलै रोजी भारताने पाकिस्तानच्या शेवटच्या सैन्याला मारत कारगिलवर तिरंगा फडकवत हे युद्ध जिंकले.