पंढरपूर: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील मोडनिंब रस्त्याजवळ असणाऱ्या परदेशी यांच्या शेत तलावात पडून तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावांवर दुख:चा डोंगर कोसळला असून नागरीक हळहळ व्यक्त करत आहेत.
मनोज अंकुश पवार (वय ११), गणेश नितीन मुरकुटे (वय ७), हर्षवर्धन नितीन मुरकुटे (वय ९) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. गणेश आणि हर्षवर्धन हे दोघे भाऊ आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करकंब शहरालगत असलेल्या मोडनिंब रोडवरील परदेशी यांच्या शेतात ही मुळे गेली होती. खेळत असतांना ही तिन्ही मुळे येथील शेतात असलेल्या शेत तळ्यात पडली. दरम्यान, ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. ग्रामस्थांनी तातडीने शेतात धाव घेतली. काही नागरिकांनी तातडीने या तलावात उतरून तिन्ही मुलांना बाहेर काढले. करकंब पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले होते.
त्यांनी तातडीने या तिन्ही मुलांना तात्काळ सदर ठिकाणी धाव घेऊन या तलावातून मनोज शासकीय रुग्णालयात भरती केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, ही मुले तलावात कधी उतरली. या घटनेमागे काही घात पात तर नाही ना या दृष्टीने देखील पोलिस तपास करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर, गावात शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.