नवी मुंबईच्या कामोठे येथील दुहेरी हत्याकांडाचा २४ तासात पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला आहे. कामोठे सेक्टर ६ मधील ड्रीम सोसायटीच्या प्लॅट क्रमांक १०४ मध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आई व मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली होती. कामोठ्यातील हे दुहेरी हत्याकांड समलैंगिक संबंधावरून झाल्याचे समोर आले आहे.
कामोठे य़ेथील एका फ्लॅटमध्ये ७० वर्षीय गीता जग्गी आणि त्यांचा ४५ वर्षीय मुलगा भूषण जग्गी यांचा मृतदेह आढळला होता. जितेंद्रच्या अंगावर मारल्याचे व्रण आढळल्याने ही हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. कामोठे पोलिसांनी प्रथम अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या तपासासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती. या पथकाने सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून संज्योत मंगेश दोडके ( वय १९ वर्ष), शुभम महिंद्र नारायणी (वय १९ वर्ष) यांना उलवे परिसरातून ताब्यात घेतले होते.
संज्योट दोडके आणि शुभम नारायणी अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबानुसार मृत जितेंद्र याच्याशी त्यांची गेल्या दीड वर्षांपासून मैत्री होती. त्याने थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी दोघांना आपल्या घरी बोलावले होते. तिघांनी मिळून रात्री दारू प्यायली होती. दारूच्या नशेत जितेंद्र याने शुभम आणि संज्योत यांच्याकडे समलिंगी संबंध प्रस्थापित करण्यासाठी आग्रह धरला. याचा दोघांनी विरोध केला. मात्र जितेंद्र काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता, तो समलैंगिक संबंधासाठी हट्ट करू लागला. यामुळे चिढून शुभम नारायणी याने एक्सटेंशन बोर्ड जितेंद्रच्या डोक्य़ात घातला. घाव वर्मी बसल्याचे त्याचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर संज्योत दोडके याने जितेंद्रची ७० वर्षीय आई गीता जग्गी यांचा गळा आवळून त्यांना ठार मारले. हत्येचे प्रकरण बाहेर येऊन नये म्हणून त्यांनी मृतांचे मोबाईल फोन, पाकीट, टॅब आणि घरातील दागिने चोरून नेले. तसेच घरातील एलपीजी गॅस ऑन करून गॅस लिक झाल्याचा बनाव केला. मात्र पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करत आरोपींना २४ तासात जेरबंद केले.
बुधवारी सायंकाळच्या सुमारास एका घरात मायलेकाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता घरातील एलपीजी गॅस सिलिंडर लिक असल्याचे दिसून आले होते. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून सोसायटीचे सीसीटीव्ही चेक करण्यास सुरवात केली होती.
संबंधित बातम्या