मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Porsche Car Accident : रक्ताचा मूळ नमुना अगरवाल दाम्पत्याकडे? या प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर

Pune Porsche Car Accident : रक्ताचा मूळ नमुना अगरवाल दाम्पत्याकडे? या प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 03, 2024 12:41 PM IST

Pune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणी मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचे उघड झाले आहे. खरे रक्ताचे नमुने हे अगरवाल दाम्पत्याकडे असल्याची माहिती पोलीसांकडे असून या प्रकारचा पोलिस तपास करत आहेत.

खरे रक्ताचे नमुने हे अगरवाल दाम्पत्याकडे असल्याची माहिती पोलीसांकडे असून या प्रकारचा पोलिस तपास करत आहेत.
खरे रक्ताचे नमुने हे अगरवाल दाम्पत्याकडे असल्याची माहिती पोलीसांकडे असून या प्रकारचा पोलिस तपास करत आहेत.

Pune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणी १९ तारखेचे सीसीटीव्ही पुणे पोलिसांच्या हाती लागले आहे. हे फुटेज सुसून रुग्णालयातील असून या माध्यमातून या प्रकरणात आणखी काही जण सामील असल्याची माहिती पुढे येणार आहे. दरम्यान, बदललेले रक्ताचे नमुने हे अगरवाल दाम्पत्याकडे असण्याची शक्यता आहे, त्यानुसार तपास पुणे पोलिस करणार असल्याची माहिती या प्रकरणाचा तपास करत असलेले असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात दिली. दरम्यान, अपघात झाल्याच्या दिवशी आपण दारू प्यायली असल्याची माहिती आरोपी मुलाने दिली आहे. या प्रकरणी संपूर्ण अगरवाल कुटुंबीय हे तुरुंगात असून आरोपीच्या आई वडिलांना ५ जून पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कल्याणीनगर अपघात प्रकरणात रोज नवी नवी माहिती पुढे येत आहे. रविवारी सुट्टीच्या कोर्टात आरोपीचे आई वडील यांना उभे करण्यात आले होते. अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक वडील विशाल आणि आई शिवानी अगरवाल यांना अटक करण्यात आली आहे. नेमके कोणाच्या मध्यस्थीने अगरवाल दाम्पत्याने डॉ. अजय तावरे यांच्याशी संपर्क साधला? तसेच अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हाळनोरला कोणी सांगितले, याचा पोलिस तपास करत असल्याची माहिती तांबे यांनी न्यायालयात दिली.

दरम्यान, या प्रकरणी डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, व शिपाई अतुल घटकांबळे यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना या प्रकरणी अगरवाल दाम्पत्याच्या रक्ताचे नमुने घेऊन डीएनए चाचणीसाठी पाठवायचे आहेत. विशाल अगरवाल यांनी घटकांबळे याच्याशी संपर्क साधत दोन मध्यस्थांच्या माध्यमातून डॉ. हाळनोरला तीन लाख रुपये दिल्याची महितीह तपासात उघड झाली आहे. त्यामुळे या प्रकारात मध्यस्ती कुणी केली याचा शोध पोलिस घेत आहे.

नमुने घेण्यासाठी वापरलेली सुई अगरवाल दाम्पत्याकडे

या प्रकरणी पुरावा नष्ट करण्यासाठी डॉ. हाळनोर याने अल्पवयीन मुलगा व इतरांचे रक्ताचे नमुने घेण्यासाठी वापरलेली सुई अगरवाल दाम्पत्याला दिला असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. या चा देखील तपास करायचा असल्याने अगरवाल दाम्पत्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती करण्यात आली. दोन्ही बाजूच्या युक्तिवाद ऐकल्यावर विशेष न्यायाधीश एस. एस. वाघमारे यांनी अगरवाल दाम्पत्याला पोलीस कोठडीचे आदेश दिले.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग