Kalyan: पत्नीला बॉससोबत शारीरिक संबंध ठेवायला सांगितले; नकार देताच घटस्फोट देऊन घराबाहेर काढले!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kalyan: पत्नीला बॉससोबत शारीरिक संबंध ठेवायला सांगितले; नकार देताच घटस्फोट देऊन घराबाहेर काढले!

Kalyan: पत्नीला बॉससोबत शारीरिक संबंध ठेवायला सांगितले; नकार देताच घटस्फोट देऊन घराबाहेर काढले!

Dec 24, 2024 08:03 PM IST

Kalyan Software Engineer News: पत्नीने बॉससोबत शारिरीक संबंध ठेवायला नकार दिला म्हणून एका व्यक्तीने तिला घटस्फोट दिला. कल्याणमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.

पत्नीला बॉससोबत शारीरिक संबंध ठेवायला नकार दिला म्हणून पतीने घेतला घटस्फोट
पत्नीला बॉससोबत शारीरिक संबंध ठेवायला नकार दिला म्हणून पतीने घेतला घटस्फोट

Triple Talaq: कल्याणमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरने त्याच्या पत्नीला एका पार्टीमध्ये बॉससोबत शारिरिक संबंध ठेवायला सांगितले. मात्र, तिने याला नकार दिला. त्यामुळे राग अनावर झाल्याने त्याने पत्नीला घटस्फोट देऊन तिला घराबाहेर काढले. यानंतर पीडित महिलेने संभाजीनगर पोलीस ठाण्यात पतीविरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोहेल शेख असे आरोपी पतीचे नाव असून तो एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत आहे. आरोपीचे पहिले एक लग्न झाले असून पीडिता त्याची दुसरी पत्नी आहे. आरोपी काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नीसोबत एका पार्टीमध्ये गेला होता, तिथे त्याचा बॉसदेखील होता. त्यावेळी आरोपीने पीडिताला आपल्या बॉससोबत शारीरिक संबंध ठेवायला सांगितले. परंतु, पीडिताने नकार दिला. यानंतर आरोपीने पीडिताला माहेरहून १५ लाख रुपये आणायला सांगितले, जे त्याच्या पहिल्या पत्नीला द्यायचे होते. पण पीडिता पैसे आणण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या आरोपीने पीडिताला घटस्फोट देऊन घराबाहेर काढले.

आरोपीच्या अशा वागणुकीमुळे वैतागलेल्या पीडिताने छत्रपती संभाजीनगर येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर हे प्रकरण कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. पोलिसांनी आरोपी पती सोहेल शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

देशात तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणारा कायदा असूनही अशा घटना उघडकीस येणे ही चिंतेची बाब आहे. महिलांची सुरक्षा आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज या प्रकरणाने पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. दरम्यान, या प्रकरणी लवकरच आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

याआधी ठाण्यातील मुंब्रा परिसरात पत्नी एकटी फिरायला गेल्याने पत्नीला तिहेरी तलाक दिल्याने एका व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पत्नी त्याला सोडून एकटी फिरायला गेली म्हणून आरोपीने तिला तलाक दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने २२ ऑगस्ट २०१७ रोजी दिलेल्या निर्णयात तिहेरी तलाक असंवैधानिक म्हणून घोषित केले. सर्वोच्च न्यायालयाने १४०० वर्षे जुनी प्रथा असंवैधानिक घोषित केली आणि सरकारला कायद्यात बदल करण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने कायदा करताना तीन तलाक बोलून किंवा लिहून विवाह संपवणे हा गुन्हा ठरवला. या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त तीन वर्षांच्या कारावासाचीही तरतूद आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर