Kalyan News : सुट्ट्या पैशांवरुन वाद; तरुणाची महिला तिकीट बुकिंग क्लार्कला बेदम मारहाण, कल्याण रेल्वे स्टेशनवरील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kalyan News : सुट्ट्या पैशांवरुन वाद; तरुणाची महिला तिकीट बुकिंग क्लार्कला बेदम मारहाण, कल्याण रेल्वे स्टेशनवरील घटना

Kalyan News : सुट्ट्या पैशांवरुन वाद; तरुणाची महिला तिकीट बुकिंग क्लार्कला बेदम मारहाण, कल्याण रेल्वे स्टेशनवरील घटना

Updated Oct 18, 2024 07:16 PM IST

Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे स्थानकात सुट्ट्या पैशांच्या वादातून महिला क्लार्कला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. रोशना पाटील असे मारहाण झालेल्या महिला तिकीट क्लार्कचे नाव आहे.

रेल्वे तिकीट बुकिंग क्लार्कला मारहाण
रेल्वे तिकीट बुकिंग क्लार्कला मारहाण

बसमध्ये तसेच रेल्वेच्या तिकीट खिडकीवर सुट्ट्या पैशांवरून तिकीट बुकिंग क्लार्क, कंडक्टर तसेच प्रवाशांमध्ये अनेकदा वादाचे प्रकार पाहायला मिळतात. सुट्टे पैसे दिल्याशिवाय बुकिंग क्लार्क तिकीट द्यायला तयार नसतो. त्यामुळे झालेले वाद पोलीस ठाण्यापर्यंतही पोहोचले आहेत. असाच एक प्रकार कल्याण रेल्वे स्टेशनवर समोर आला आहे.

कल्याण रेल्वे स्थानकात सुट्ट्या पैशांच्या वादातून महिला क्लार्कला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. रोशना पाटील असे मारहाण झालेल्या महिला तिकीट क्लार्कचे नाव आहे. मारहाणीनंतर रोशना पाटील यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारहाण करणाऱ्या अन्सार शेख नावाच्या तरुणाला कल्याण रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 

या मारहाणीत तिकीट बुकिंग क्लार्क गंभीर जखमी झाली आहे. या घटनेने महिला रेल्वे कर्मचाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकातील फूट ओव्हर ब्रिजवरील तिकीट काऊंटरसमोर घडला. येथे एक सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी लोकांना  तिकीट वेंडिंग मशीनवर तिकीट काढून देत होता. त्याठिकाणी आलेल्या एका तरुणाने या व्यक्तीकडे तिकिट मागि तले. सुट्ट्या पैशावरुन दोघांमध्ये वाद झाल्यानंतर हा व्यक्ती सुट्ट्या पैशासाठी तिकीट काऊंटरच्या दिशेने गेला.

तिकीट काऊंटरही पाच रुपयांच्या सुट्ट्या पैशांवरुन या तरुणाचा महिला तिकीट क्लार्क रोशना पाटील यांच्यासोबत वाद झाले. या वादाचे रुपांतर मारामारीत झाले. अन्सार शेख नावाच्या तरुणाने महिला तिकीट क्लार्क रोशना पाटील यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.  कल्याण रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई करत मारहाण करणाऱ्या प्रवासी अन्सार शेख याला ताब्यात तपास सुरू केला आहे.

घटनेची माहिती मिळताच कल्याण जीआरपी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. महिला तिकीट क्लार्कला मारहाण तसेच दुसरीकडे फेरीवाल्यांनी गोंधळ घातल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर