मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kalyan Building Collapse: कल्याणच्या रामबागमध्ये इमारत कोसळली; जीवितहानी नाही!

Kalyan Building Collapse: कल्याणच्या रामबागमध्ये इमारत कोसळली; जीवितहानी नाही!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 08, 2022 09:22 AM IST

Kalyan Building Collapse News: कल्याण येथील रामबाग परिसरात असेलेली एक दुमजली रविवारी रात्रीच्या सुमारास कोसळली. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचले असून बचाव कार्य सुरू आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.

कल्याण येथे कोसळलेली धोकादायक इमारत
कल्याण येथे कोसळलेली धोकादायक इमारत

कल्याण : कल्याणच्या (Kalyan News) रामबाग परिसरात असलेली एक धोकादायक दुमजली इमारत रविवारी मध्यरात्री कोसळली. या घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नाही. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. ही इमारत कोसळण्याने आजू बाजूला असलेल्या दोन घरांचे किरकोळ नुकसान झाले असून इमारतीच्या राड्यारोडयामुळे येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

कल्याण परिसरात इमारती कोसल्याचे सत्र हे सुरूच आहे. या घटनांमुळे येथील रहिवाशी हे त्रस्थ झाले आहेत. या बाबत येथी राहिवाश्यांनी अनेकदा पालिका प्रशासनाकडे वारंवार अर्ज आणि विनंत्या करूनही कुठलीच कारवाई केली जात नाही. काही दिववसांपूर्वी एक चाळ आणि एक मजला कोसल्याने एका एक महिला जखमी झाली होती तर तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. या नंतर पालिका प्रशासणाला जाग आली. येथील धोकादायक इमारतीचे सर्वे करून त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. असेच एक धोकादायक काम अर्धवट पडल्याने ही दुर्घटना झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

इमारत कोसळण्याचे सत्र सुरूच

कल्यान येथे अनेक धोकादायक इमारती आहेत. या परिसरारत सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने इमारती कोसळण्याचा दुर्घटना वाढल्या आहेत. पालिका प्रशासनाने या इमारतींची ओळख करून त्यांना नोटिसा देणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण पश्चिम रामबाग मेनरोड पवनबारच्या समोर कोसळलेल्या चाळीत एकाचा मृत्यू झाल्यानंतर पालिका प्रशासणाला कारवाईची जाग आली. मात्र, ही कारवाई सुद्धा अर्धवट करण्यात आली. रविवारी कोसळलेल्या इमारती संदर्भातही येथील स्थानिक नागरिकांनी पालिकेला निवेदन दिले होते. मात्र, पालिका अधिकाऱ्यांनी या कडे दुर्लक्ष केले. पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे रविवारी सायंकाळी या इमारतीचा तळमजल्याची भिंती कोसळली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र अचानक कोसळलेल्या या भिंतीमुळे दोन घरांचे किरकोळ नुकसान झाले. तर येथील रहदारीचा मुख्य रस्ता हा वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

IPL_Entry_Point

विभाग