
आपल्या प्रियकरानेच तलावात उडी मारल्याचे समजून एका तरुणीनेही त्याच तलावात स्वत:ला झोकून दिले. एका धाडसी तरुणाने तिचा जीव वाचवला मात्र तलावात उडी मारणारा तरुण तिचा प्रियकर नसून दुसऱ्याच तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला होता. काही वेळाने तिचा प्रियकर देखील तिच्या समोर आल्याने तिचा गैरसमज दूर झाला.
तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. महेश भाटिया असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना कल्याण पूर्व नांदिवली तलावात घडली. या तलावात महेश रविवारी सायंकाळी पोहण्यासाठी आला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा तलावात शोध घेतला मात्र काही वेळाने त्याचा मृतदेह मिळाला.
दरम्यान एका तरुणीला वाटले की, तिच्या प्रियकराने तलावात उडी मारली म्हणून तिने उडी मारली होती. सुदैवाने तिची जीव वाचला व काही वेळाने तिचा प्रियकरही तिच्यासमोर आल्याने तिचा गैरसमज दूर झाला.
संबंधित बातम्या
