कल्याणमध्ये आणखी एका मराठी कुटुंबाला मारहाण! मुलीशी अश्लील चाळे केल्याचा जाब विचारल्याने परप्रांतीयांकडून हल्ला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कल्याणमध्ये आणखी एका मराठी कुटुंबाला मारहाण! मुलीशी अश्लील चाळे केल्याचा जाब विचारल्याने परप्रांतीयांकडून हल्ला

कल्याणमध्ये आणखी एका मराठी कुटुंबाला मारहाण! मुलीशी अश्लील चाळे केल्याचा जाब विचारल्याने परप्रांतीयांकडून हल्ला

Dec 22, 2024 09:13 PM IST

Marathi Family Beaten in Kalyan : ९ वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला जाब विचारण्यास गेलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमधून समोर आला आहे.

कल्याणमध्ये परप्रांतीयांकडून मराठी कुटूंबावर हल्ला
कल्याणमध्ये परप्रांतीयांकडून मराठी कुटूंबावर हल्ला

Marathi Family Beaten in Kalyan : कल्याणमध्ये परप्रांतीय शुक्ला कुटूंबाने बाहेरुन माणसे बोलावून मराठी कुटूंबाला मारहाण केल्याचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच पुन्हा एकदा परप्रांतीयांची दादागिरी समोर आली आहे. ९ वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला जाब विचारण्यास गेलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तम पांडे असं मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या पत्नीनेही मारहाण केली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीसठाण्यात परप्रांतीय पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पश्चिम येथे अखिलेश शुक्ला या परप्रांतीयाने दारात अगरबत्ती व धूप लावण्याच्या किरकोळ कारणांवरुन अभिजीत देशमुख यांना बेदम मारहाण केली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यानंतर मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद पुन्हा उफाळून आला आहे. याचे पडसाद विधानभवनातही उमटले होते. यानंतर गृहविभागाने अखिलेश शुक्लावर कारवाई केली. ते प्रकरण शांत होत नाही तोच कल्याणमधूनच आणखी एका मराठी कुटूंबाला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मराठी कुटुंबातील चार वर्षीय मुलीशी अश्लील चाळे केल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या कुटुंबास उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नीने जबर मारहाण केली. या मारहाणीत मराठी तरुण जखमी झाला असून त्याच्या पत्नीला व आईलाही मारहाण करण्यात आली आहे. महिलेचा पती हा पोलीस कर्मचारी आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.या प्रकरणी पांडे पती पत्नी विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास कल्याणमधील अडीवली येथील रागाई इमारतीमध्ये दोन शेजाऱ्यांमध्ये वाद झाला होता. लहान मुलांच्या खेळण्यावरून हा वाद निर्माण झाला होता. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा परप्रांतीय शेजाऱ्याने विनयभंग केल्याचा आरोपी मुलीच्या आईने केला आहे. याचा जाब विचारायला गेल्यावर मराठी कुटुंबाला मारहाण केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर