मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  प्रसाद घेण्यासाठी घरी बोलावून ७ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, कल्याणमधील संतापजनक घटना

प्रसाद घेण्यासाठी घरी बोलावून ७ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, कल्याणमधील संतापजनक घटना

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 02, 2024 06:55 PM IST

Minor Girl Rape : प्रसाद खायला देण्याचे आमिष दाखवून नराधमाने एका सात वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केला. ही घटना कल्याण पूर्व परिसरात घडला.

कोळसेवाडी पोलीस ठाणे
कोळसेवाडी पोलीस ठाणे

कल्याणमधून एक घृणास्पद घटना समोर आली आहे. एका नराधमाने प्रसाद घेण्यासाठी ७ वर्षाच्या चिमुकलीला आपल्या घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.  कल्याण पूर्व परिसरात हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. रामलखन असे अटक केलेल्या  नराधामचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सात वर्षीय पीडिता व नराधम एकाच परिसरात रहात असल्याने  मुलगी त्याला ओळखत होती. याचा फायदा घेत आरोपीने घरासमोर खेळत असलेल्या मुलीला प्रसाद खायला देतो म्हणून घरी घेऊन गेला. रामलखन शेजारीच रहात असल्याने मुलगी त्याच्यासोबत त्याच्या घरी गेली. त्यानंतर नराधमाने घरी आलेल्या चिमुकलीवर अत्याचार केला. 

या घटनेनंतर प्रचंड घाबरलेल्या मुलीने घडलेला प्रकार घरी आई-वडिलांना सांगितला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. या घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी रामलखनला अटक केली आहे.

आरोपी कल्याणमध्ये हमालीचे काम करतो. तसेच तो घरात एकटाच राहतो. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

WhatsApp channel

विभाग