कल्याण : रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भावाचे शेजारच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य, बहिणीने बनवला व्हिडिओ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कल्याण : रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भावाचे शेजारच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य, बहिणीने बनवला व्हिडिओ

कल्याण : रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भावाचे शेजारच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य, बहिणीने बनवला व्हिडिओ

Updated Aug 29, 2023 06:37 PM IST

Kalyan crime : रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच भावा-बहिणीने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

Kalyan crime
Kalyan crime

कल्याणमधूनएक धक्कादायक घटना समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच भावा-बहिणीने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून नागरिकांमधून संतप्त प्रक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. कल्याण पूर्व येथे हा प्रकार समोर आला आहे.

अजय थापा आणि सपना थापा असे अटक दोघांचे नाव आहे. चुकीच्या मार्गाने जात असताना भावाला योग्य मार्गावर आणण्याची जबाबदारी बहिणीची असते. मात्र, कल्याणमध्ये घडलेल्या घटनेत बहिणीनेच भावाच्या गुन्ह्यात त्याला साथ दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शेजारची १२ वर्षीय मुलगी घरासमोरील अंगणात खेळत असताना आरोपीने तिला जवळ बोलवून तिच्यासोबत अश्लील चाळे केले. धक्कादायक म्हणजे, भाऊ पीडित मुलीसोबत अश्लील चाळे करत असतानाच ही विकृत घटना बहिण मोबाईलमध्ये चित्रीत करत होती. भावाच्या या विकृत घटनेचा व्हिडिओ तिने बनवला होता.भावा- बहिणीने दोघांनी मिळून परिसरात राहणाऱ्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचे तपासात समोर आले आहे.

 

पीडित मुलीने ही घटना घरी सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर कोळसेवाडी पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. अजय थापा आणि सपना थापा असे अटक दोघांचे नाव आहे. पण या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर